धम्माचे विचार ऊर्जा व आध्यात्मिकतेचे स्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:27 AM2018-11-24T00:27:42+5:302018-11-24T00:28:18+5:30
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी ५ लाखांहून अधिक अनुयायांसोबत धम्माची दीक्षा घेतली व तेव्हापासूनच हा उत्सव साजरा केला जात आहे. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेऊन धम्माच्या आदर्श व विचारांना आत्मसात करून याच्या प्रसारासाठी शक्त ते प्रयत्न केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी ५ लाखांहून अधिक अनुयायांसोबत धम्माची दीक्षा घेतली व तेव्हापासूनच हा उत्सव साजरा केला जात आहे. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेऊन धम्माच्या आदर्श व विचारांना आत्मसात करून याच्या प्रसारासाठी शक्त ते प्रयत्न केले. कारण, धम्माचे विचार अपार ऊर्जा व आध्यात्मिकतेचे स्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
शहरातील संजयनगरात नवबौद्ध समितीच्यावतीने आयोजित ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, बाबासाहेबांच्या संविधानानेच देशाची प्रगती शक्य झाली. त्यांचे आदर्श व विचार फक्त भारतातच नव्हे तर अवघ्या जगात मान्यता प्राप्त आहेत. त्यांच्या विचारांनीच जगात भारताचे नाव लौकीक वाढले आहे. बाबासाहेब हे भारतीय होते व धम्माची सुरूवात भारतातून झाली असून तथागत गौतम बुद्ध भारतभूमीत जन्मले असल्याचेही मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष किशोर भालाधरे होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, सचिव विकास चव्हाण, कोषाध्यक्ष साजन गजभिये, राकेश ठाकूर, डॉ. प्रशांत मेश्राम, अनिल सुखदेवे, ज्योतीप्रकाश गजभिये, रोशन जायस्वाल, बंटी भालेराव, संजय गणवीर, देवानंद बोरकर, भागवत मेश्राम, विवेक मिश्रा, सतीश मेश्राम, विनोद पंधरे, छोटू पंचबुद्धे, सुनील तिवारी, बंटी बानेवार, विजय बावनकर, दीपक वाहने, रंजीत शहारे, गौतम डहाट, दिपक घरडे, दिनेश उके, हर्षपाल रंगारी, विष्णू नागरीकर, अनिल डोंगरे, देवा रूसे, रूपेश फुले, मनिष रामटेके, दिलीप बोरकर, विजय गडपायले, मनोज डहाट, नितीन डोंगरे, शेखर मेश्राम, संजय गवळी, भिमदास उके, सोनू गडपायले, रवि भालाधरे, बिट्टू खान, गोलू खोब्रागडे, संघर्ष बोरकर, राजेश रूसे, गुलशन टेंभूर्णीकर, अन्नु श्रीवात्री, बंडू बागडे, जे.एम.मेश्राम, विजय चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.