सटवा गावाची आदर्श स्मार्ट ग्रामकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:04 PM2018-10-27T22:04:41+5:302018-10-27T22:06:46+5:30

शासनाच्या विविध विकासात्मक योजना गावात राबवून सटवा गावाला आदर्श ग्राम करण्याचा संकल्प येथील सरपंचाने केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुध्दा सुरू केली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणे, रोजगार निर्माण करणे, .......

The ideal of Sathwa village is headed towards Smart Village | सटवा गावाची आदर्श स्मार्ट ग्रामकडे वाटचाल

सटवा गावाची आदर्श स्मार्ट ग्रामकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देशासकीय निधीतून विकास कामे : गावाचा कायापालट करण्याचा संकल्प, वृक्षारोपण करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शासनाच्या विविध विकासात्मक योजना गावात राबवून सटवा गावाला आदर्श ग्राम करण्याचा संकल्प येथील सरपंचाने केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुध्दा सुरू केली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणे, रोजगार निर्माण करणे, गावातील युवक, प्रौढ यांना एक छताखाली आणणे, गाव भक्तीमय करणे, वाचणालय, पथदिवे, वृक्षारोपण,ग्रामपंचायत सुशोभीत व फळबाग तयार करु न स्मार्टग्राम करण्याचा संकल्प सरपंच विनोद पारधी यांनी केला आहे.
तालुक्यातील सटवा येथील सरपंच विनोद पारधी हे कला शाखेत पदवीधर असून लहानपणापासून समाजकारण करण्याची आवड होती यामुळे़ नोकरी न करता शेती व्यवसायाबरोबर समाज कार्य सुरु केले. सन २०१७ मध्ये ग्रामपंचायत सटवाच्या निवडणुका लागल्या यात सरपंच पदाकरीता भारतीय जनता पक्षाला समर्थन करु न विनोद पारधी यांनी निवडणुक जिंकली व सरपंचपदी आरुढ झाले. यानंतर सर्व प्रथम गावातील युवकांना एकत्र करुन स्वच्छ भारत अभियान राबविले. गावातील केरकचरा ,प्लास्टीक पिशव्या गोळा करण्यास सुरु वात केली. घरोघरी प्रत्येक कुटुंब निहाय शौचालय इमारत बांधकाम करण्यास प्रवृत्त केल्याने उघड्यावर शौचविधी बंद केला. सांडपाणी वाहुन नेणाऱ्या सिंमेट काक्र ींट नाल्या तयार करु न त्यावर झाकण तयार केले.
गावात पिण्याचे पाणी स्त्रोत १६ हातपंप, ४० खासगी विहिरी, २ शासकीय विहिरी असून पाणी टंचाई होवू नये, म्हणून विहिरीची गाळ काढले व हातपंपाना लागणारे साहीत्य मिळवून घेतल्याने पाणी टंचाईवर मात करता आले.
प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, सबरी घरकुल योजनाचे घरकुल गरजू लाभार्थ्यांना मिळत आहे. महिला, पुरु ष मजुरांना कामाचा लाभ देण्यासाठी मग्रारोहयोव्दारे रानतलाव खोलीकरणासाठी २१ लाख ७६ हजार ८८० रु पये मंजूर करु न २०१४ मजुरांना काम देण्यात आले. पर्यावरण समतोल राखण्यासाठी ५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. गावकऱ्यांना मुख्य व्यवसाय शेती आहे. पण सिंचनाचा प्रश्न आहे यावर तोडगा निघावा म्हणून कंटगी मध्यम प्रकल्पाचे पाणी कालव्याव्दारे रानतलावात सोडणे त्यातून गाव तलावात आणल्यास सिंचनाचा प्रश्न आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्तीने प्रश्न लागणार आहे.
रस्त्यांचे जाळे तयार करणार
जिल्हा परिषदेतंर्गत ३०/५४ निधी अंतर्गत डव्वा, सटवा, चिचगावटोला, सिलेगाव, मेंगाटोला, पाथरी, गोरेगाव रस्त्याचे बांधकाम मंजूर झाल्याने या मार्गावर लवकरच बससेवा सुरु करण्यात येणार आहे. गावातील महिला बचत गटांना उमेदसह जोडण्यात आले आहे. सटवा स्मार्ट गाव करण्यासाठी भक्तीमय वातावरण निर्माण करु न ३ भजन मंडळे तयार करण्यात आली. यामंडळाव्दारे गुरु वारी व शनिवारला मंदिरात कीर्तन माला,भजने आयोजीत केल्या जात आहे.

पदाधिकाºयांनी
केला संकल्प
वाचनालय तयार करण्याचे प्रस्ताव असल्याने सटवा हे गाव स्मार्ट गाव करणार असे सरपंच विनोद पारधी यांनी सांगितले. सटवा स्मार्ट गाव करण्यासाठी उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, सदस्य गणराज रहांगडाले, ओमेंद्र ठाकुर, रामेश्वरीताई ठाकुर, गिता रहांगडाले,चित्ररेखा रहांगडाले,सुर्यकांता चौधरी , ग्रामसेविका सविता पाटील,भाकचंद रहांगडाले,मयूर कोल्हे, सुभाष ठाकुर, राजेश रहांगडाले, नूतन बिसेन व गावकºयांचे सहकार्य मिळत आहे.

Web Title: The ideal of Sathwa village is headed towards Smart Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.