मागेल त्याला सिंचन विहीर अंतर्गत १४० विहिरी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:00 AM2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:13+5:30
तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय लपाजिप उपविभागाच्या वतीने आॅनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. तालुुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी ८०५ शेतकऱ्यांनी आॅनलाईनद्वारे १३ हजार सिंचन विहीर योजने अंतर्गत विहिरीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्जापैकी ९२ अर्ज अपात्र करुन ७१३ अर्ज पात्र होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : मागेल त्याला १३ हजार सिंचन विहीर योजने अंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ मार्च २०१९ च्या स्तरावर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४० विहिरी मंजूर झाल्या. सबंधीत कार्यालयाच्यावतीने विहिरी बांधकाम करण्यात येते. या कार्यालयात अद्यापही अनुदानाची रक्कम उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले आहे.
तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय लपाजिप उपविभागाच्या वतीने ऑनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.
तालुुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी ८०५ शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे १३ हजार सिंचन विहीर योजने अंतर्गत विहिरीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्जापैकी ९२ अर्ज अपात्र करुन ७१३ अर्ज पात्र होते. शेतामधून हमखास उत्पादन घेण्यासाठी शेतात विहिरीची सोय व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात अर्ज ऑनलाईन केले होते.
सदर योजने अंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्याना प्रती विहीर अनुदान २ लाख ५० हजाराचे रुपये दिले जाते. सदर विहिरीमध्ये बोअरवेल खोदण्याची सुध्दा सुविधा आहे. तालुक्यातील ८०५ शेतकऱ्यांनी विहिरीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज केले असले तरी त्यातील फक्त १४० विहिरी मंजूर होऊन पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात आली.
१२५ लाभार्थ्यांचे करार
मार्च महिना सुरु झाला असला तरी विहीर बांधकामाच्या खोदकामाला पाहिजे त्या प्रमाणात प्रारंभ झाला नसल्याने तालुक्यात विहिरीचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरु असल्याचे चित्र आहे. १४० मंजूर विहिरींपैकी सध्या स्थितीत केवळ १२५ निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यानीच करारनामे केले आहे. मंजूर विहिरीपैकी सध्या ५० विहिरीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून येत आहे.
बांधकामाकडे प्रत्यक्ष लक्ष नाही
अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांनी कामांचा शुभारंभ केल्या नसल्याचे सांगण्यात येते. अधिक माहिती घेतली असता जे कंत्राटदार नित्यनेम कार्यालयाचे पायऱ्या झिजवितात त्याच्याकडे सबंधितांची चांगली मेहेरबानी असल्याचे बोलले जाते. सबंधित अधिकारी प्रत्यक्ष विहीर बांधकाम खोदकामाकडे जातात की नाही हे कळायला मार्गच नाही. गरजू लाभार्थी अनुदानाअभावी आजही विहीर बांधकाम करण्यास अनुदान मिळत नसल्याने अनुउत्सुक असल्याचे चित्र आहे.