क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास होणार शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:26 PM2019-05-31T22:26:40+5:302019-05-31T22:26:57+5:30

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती नियमीतपणे आरोग्य विभागाला देणे बंधनकारक केले आहे.

If you do not know the information about tuberculosis, then education will be done | क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास होणार शिक्षा

क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास होणार शिक्षा

Next
ठळक मुद्देनियमित माहिती देणे बंधनकारक : जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी काढले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती नियमीतपणे आरोग्य विभागाला देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा त्यांना शिक्षा होऊ शकते अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर.जे. पराडकर यांनी दिली.
अधिसूचनेत क्षयरुग्ण उपचारावर आहेत. परंतु माहिती न देणाºया खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेते यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (१८६० क ४५) कलम २६९ अन्वये ६ महिन्यांची शिक्षा व दंड करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. कलम २७० अन्वये दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडात्मक कारवाई करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. मायक्रोबायोलॉजीस्ट व पॅथोलॉजीस्ट यांनी परिशिष्ट १ तर चिकित्सक, छातीचे तज्ज्ञ चिकित्सक, क्ष-किरण तज्ज्ञ यांनी परिशिष्ट २ मध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी क्षयरुग्णांच्या नोंदी कराव्यात.वरिष्ठ औषधोपचारांवर पर्यवेक्षक (एटीएस), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (एसटीएलएस),ट्युबरक्युलॉसीस हेल्थ व्हिजीटर (टीबीएचव्ही), जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे क्षय रुग्णांचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिनकोड, बचत खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधारकार्ड इत्यादी माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. क्षयरुग्णाला देण्यात आलेल्या औषधांची उपचार पद्धती, रुग्णांची प्रगती, थुंकी नमुने, तपासणी ही माहिती देखील देण्यात यावी,असे नमूद केले. जिल्हा स्तरावर अत्याधुनिक सिबीनॅट मशिनद्वारे थुंकी नमुन्याची मोफत तपासणी जिल्हा क्षयरोग केंद्रात करुन दिली जाते. क्षयरुग्णांना शासन स्तरावरुन विनामुल्य औषधोपचार, तपासण्या, आरोग्य शिक्षण व पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये देण्यात येत आहेत.खाजगी चिकित्सकांनी क्षयरोगाचे निदान केल्याबाबतची माहिती खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक, खाजगी औषधी विक्रेत्यांनी नियमित देण्याच्या सूचना केल्या असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर.जे.पराडकर यांनी सांगितले.
एक हजार रूपये अनुदान
खाजगी चिकित्सकांनी क्षय रुग्ण नोंदणी केल्याबाबत ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तर क्षय रुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर परिणाम कळविल्यास ५०० असे एकूण एक हजार रुपये शासन स्तरावरुन क्षयरुग्ण निहाय देण्यात येणार आहे.

Web Title: If you do not know the information about tuberculosis, then education will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.