सभापतिपदी रहांगडाले तर उपसभापतिपदी डिंकवार
By admin | Published: June 15, 2017 12:25 AM2017-06-15T00:25:16+5:302017-06-15T00:25:16+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सभापतीपदी डॉ. चिंतामण रहांगडाले व उपसभापतीपदी विजय डिंकवार
अविरोध निवड : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सभापतीपदी डॉ. चिंतामण रहांगडाले व उपसभापतीपदी विजय डिंकवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातून एकही उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुकीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हुमने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस.डब्ल्यू. गायधने, बी.एल. कुर्वे उपस्थित होते. सभापती व उपसभापती निवडून आल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, संघटन मंत्री बाळा अंजनकर, तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, माजी प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उमाकांत हारोडे, नगरसेवक राजेश गुणेरिया, अशोक अरोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या निवडणूक कार्यक्रमावेळी प्रामुख्याने नवनिर्वाचित संचालक तेजराम चव्हाण, भूमेश्वर रहांगडाले, मिलींद कुंभरे, घनश्याम पारधी, तिरुपती राणे, जितेंद्र रहांगडाले, चतुर्भूज बिसेन, दीपक पटले, श्रावण रहांगडाले, दिनेश चोभरे, प्रभा घरजारे, प्रतिमा जैतवार, जयप्रकाश गौतम, कमलेश मलेवार, मधू अग्रवाल, ओम पटले, मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या विजयाचे श्रेय तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आ. विजय रहांगडाले यांना देण्यात आले.