शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:47 AM2017-10-29T00:47:45+5:302017-10-29T00:48:04+5:30

गोंदिया शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होताच जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला प्रकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला.

Ignore attention to the rural areas of the city | शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या : कमी पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होताच जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला प्रकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला. मात्र यंदा शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पण, याकडे जिल्हा प्रशासाने डोळेझाक केली असल्याने शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असेच चित्र पाहयला मिळत आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ७५० मि.मी.पावसाची नोंद झाली. परिणामी जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पामध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. कमी पावसामुळे भूजल पातळी सुध्दा एक ते दीड मीटरने खालावली. जलाशयातील पाण्यावरच भूजल पातळी अवलंबून असते. शिवाय सिंचन आणि पाणी पुरवठा विभाग देखील त्यानुसार टंचाई आराखडा तयार करुन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करीत असते. पण, यंदा जिल्ह्यात सर्वत्र कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सडक-अजुनी, गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील काही गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यास चार ते पाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच पाणी टंचाईची ओरड सुरू झाल्याने प्रशासनाची सुध्दा झोप उडाल्याचे चित्र आहे. मागील ३० वर्षांत कधी नव्हे ते यंदा गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला जलाशयाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. मात्र सिंचन प्रकल्पांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा असल्याने यावर मार्ग काढायचा कसा अशी बिकट समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर त्वरीत बैठक घेवून तोडगा काढला. मात्र ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला वेळ नसल्याचे चित्र आहे.
गत सहा वर्षांमध्ये यंदा सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात मागील पाच सहा वर्षातील पावसाच्या सरासरी नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून येते. २०१०-११ मध्ये १०४९ मि.मी., २०११-१२ मध्ये १३८५.८० मि.मी.२०१२-१३ मध्ये १६७२.१० मि.मी., २०१३-१४ मध्ये ८२८.२० मि.मी.२०१४-१५ मध्ये ९७८.६० मि.मी., २०१५-१६ मध्ये १०११.७७ मि.मी.२०१५-१६ मध्ये १०११.७७ मि.मी.आणि २०१७ मध्ये केवळ ७५० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
जनावरांच्या चाºयाची समस्या
कमी पावसामुळे यंदा धानाच्या उत्पादनात देखील घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर पावसाअभावी जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गावातील तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी चाºयाची सोय कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Ignore attention to the rural areas of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.