आठवडे बाजारात कोरोनाच्या भीतीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:28 AM2021-02-13T04:28:07+5:302021-02-13T04:28:07+5:30
केशोरी : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण देश हादरुन गेला असून त्यातून गोंदिया जिल्हा, गाव सुटला ...
केशोरी : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण देश हादरुन गेला असून त्यातून गोंदिया जिल्हा, गाव सुटला नाही. अनेकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. ही सत्यता नाकारुन चालणार नाही.
सध्या शासनाने लॉकडाऊन शिथिल करुन आठवडे बाजार भरविणे सुरु केले आहे. त्याचा अर्थ कोरोना या भयंकर महामारीकडे दुर्लक्ष करणे होत नाही.? प्रत्येकाने आपआपल्या प्रकृतीची काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून सुचविलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परंतु केशोरी येथे दर आठवड्याला भरणाऱ्या बाजारामध्ये कोणताही दुकानदार आणि ग्राहकांना मास्कचा उपयोग आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे भान राहिले नाही.? याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन दुकानदार आणि ग्राहकांना मास्क लावणे आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होणे अजूनही थांबलेला नाही.? कोरोनाची भीती कायम असून केंद्रीय आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना संसर्गाच्या सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.? यासाठी शासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु केशोरी येथील आठवडे बाजारात एक नगर टाकली असता कोणताही दुकानदार किंवा ग्राहक मास्क वापरताना दिसून येत नाही.? सामाजिक अंतर ठेवणे दूरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांबरोबर दुकानदार सुद्धा नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवणारे ग्रामपंचायत प्रशासन हातावर हात ठेवून बसल्याने कुणालाच नियम पाण्याची गरज वाटत नाही.? काही सुजाण नागरिक मास्क वापरुन इतरांना सजग करताना दिसत असतात परंतु त्यांची खिल्ली उडविली जाते. हे प्रकार वाढत आहेत. केशोरी या गावातील बँक, कपडा, किराणा, भाजीपाला, हॉटेल, पान टपरीवाले कुणीही मास्क वापरत नाही.? किंवा फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाही.? यामुळे कोरोनाचा संसर्ग केव्हा उद्रेक हे काहीच सांगता येत नाही.? वेळीच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन मुकदर्शकाची भूमिका न घेता पथदर्शकाची भूमिका घेऊन कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे.