कोसमतोंडी येथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:31+5:302021-05-08T04:30:31+5:30

सडक-अर्जुनी : तालुक्यातील कोसमतोंडी येथील बाजार चौकातील अतिक्रमण हटविण्यासंबंधात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु वरिष्ठांनी ग्रामपंचायत ...

Ignoring the encroachment at Kosmatondi | कोसमतोंडी येथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

कोसमतोंडी येथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

Next

सडक-अर्जुनी : तालुक्यातील कोसमतोंडी येथील बाजार चौकातील अतिक्रमण हटविण्यासंबंधात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु वरिष्ठांनी ग्रामपंचायत कोसमतोडींला अतिक्रमण हटविण्याचे पत्र दिले. त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा गौरेश ब्राह्मणकर यांनी दिला आहे.

मागील अनेक वर्षांपासून कोसमतोंडी येथे आठवडी बाजार भरत असून, परिसरातील अनेक शेतकरी व व्यापारी या बाजारात आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. ग्राम कोसमतोंडी येथील गट क्र.५०२ या गट क्र.०.२८ हेक्टर आर ही जागा आठवडी बाजारासाठी निश्चित करण्यात आली, परंतु अतिक्रमणामुळे या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यास अडचण निर्माण होत आहे. या जागेवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे अनेक वेळा ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, परंतु काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रश्नांवर चर्चाच करण्यात आली नाही. अतिक्रमणाच्या बाबतीत १८ मार्च रोजी अर्ज करण्यात आला होता, परंतु ग्रामसेवकाने अर्जाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कोसमतोंडी ग्रामवासीयांनी पुन्हा २७ एप्रिलला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी, तहसीलदार सडक-अर्जुनी यांना निवेदन देऊन हे प्रकरण निदर्शनास आणून दिले होते. यावर गटविकास अधिकारी यांनी दिनांक ३ मे रोजी ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमणे आणि अडथडे दूर करण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ चे कलम ५३ मध्ये नमूद केल्यानुसार अतिक्रमण काढण्याचे अधिकार हे ग्रामपंचायत पंचायतीला आहेत, असे नमूद करीत हे प्रकरण ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कार्यवाही करण्याचे आदेश ग्रामपंचायतला दिले.

.....

ग्रामसेवकाचे उडावाउडवीचे उत्तर

गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशावर काय कार्यवाही करण्यात आली, असे विचारण्यासाठी काही ग्रामस्थ कार्यालयात गेले असता, ग्रामसेवक गोमासे यांनी उडवाउडवीचे उत्तर देत आलेल्या ग्रामस्थांना हाकलले. या संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवक गोमासे यांची भूमिका व जनसामान्यासोबतचे व्यवहार बरोबर नसल्याने, त्यांच्या निलंबनाची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. बाजार चौकातील अतिक्रमण न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

बॉक्स

कोसमतोंडीचे सरपंच यांचे घर बाजार चौकातील अतिक्रमणात असल्याने, अतिक्रमण काढण्यास अधिकाऱ्यांचा विरोध असल्याचा आरोप आहे. ग्रामसेवक गोमासे यांची दुहेरी भूमिका आहेत. सरपंचाचे घर अतिक्रमणमध्ये आहे, तर आम्ही आपले बांधकाम बंद करणार नाही, अशी भूमिका अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमणधारक यांनी घेतली आहे. सरपंचाच्या अतिक्रमणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

गौरेश बावनकर, गावकरी कोसमतोंडी

Web Title: Ignoring the encroachment at Kosmatondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.