सिंदीटोलाच्या मंदिर परिसरात अवैध उत्खनन
By admin | Published: January 7, 2016 02:22 AM2016-01-07T02:22:53+5:302016-01-07T02:22:53+5:30
तिरोडा तालुक्यातील करटी बु. येथून ३ किमी अंतरावर असलेल्या सिंदीटोला पहाडीवर सती अनुसया मातेचे मंदिर आहे.
६० फूट खोल उत्खनन : महसूल विभागाचे होतेय दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील करटी बु. येथून ३ किमी अंतरावर असलेल्या सिंदीटोला पहाडीवर सती अनुसया मातेचे मंदिर आहे. त्या ठिकाणी शिवलींग, दुर्गा माता, माँ बम्लेश्वरीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच ६० ते ७० फुट खोल अवैध उत्खनन करण्यात आले. त्याठिकाणी भाविकांना येता-जाताना पाय घसरल्यास ही बाब त्यांच्या जीवावर बेतू शकते.
या ठिकाणी देऊळ असले तरी खनीज अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी न करता परवानगी दिली कशी अशा प्रश्न भाविक व नोरिकांना पडला आहे. याठिकाणी मातेच्या मंदिरात गर्दी असायची. यात्रा भरत असे पण जेव्हापासून खनीज विभागाने खनीज उत्खननाला प्रोत्साहन दिले. तेव्हापासून अवैध उत्खनन त्या परीसरात होत आहे. काही भाविकांनी विरोध केला पण पैसावाल्यांच्या समोर गरीबाची कोण अधिकारी ऐकतो अशी गत झाली. समोरील जागेत अवैध मुरूम काढण्यात आले. त्या ठिकाणी आता ही खोदकाम केलेले खड्डे आहेत. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुंभकर्णी झोपेत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे.
एखादा शेतकरी व नागरिकाने घर कामाकरिता गीट्टी किंवा मुरूम नेले तर त्याच्यावर दंड आकारून पोलीसात गुन्हा नोंदवितात. अवैध उत्खनन करून कंत्राटदाराने मातेच्या मंदिराचे दृष्य हरपून गेले असून मंदिर परिसराचे दृष्य विद्रुप केले आहे. त्या अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आहे. परवानगी शिवाय मुरूमाचे अवैध उत्खनन कसे झाले हे महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणात लाखो रूपयाचे गौण खनिज चोरीला गेले आहे. त्यामुळए महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)