चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:03 PM2018-05-10T22:03:23+5:302018-05-10T22:03:23+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यातून रेल्वे व खासगी वाहनातून दारुची तस्करी केली जात आहे. गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस नाकाबंदी करीत असताना गोंदियाकडून येणाऱ्या एका व्हर्ना कारमधून मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जप्त करण्यात आला.

 An illegal liquor was caught in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

googlenewsNext
ठळक मुद्देसाडेपाच लाखांची दारु जप्त : डुग्गीपार पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यातून रेल्वे व खासगी वाहनातून दारुची तस्करी केली जात आहे. गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस नाकाबंदी करीत असताना गोंदियाकडून येणाऱ्या एका व्हर्ना कारमधून मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमारा चौकातील नवेगाव फाट्याकडे जाणाºया मार्गावर गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करीत असताना गोंदियाकडून येणाºया व्हरणा गाडी क्रमाक एमएच ३१/ईपी-११६१ या गाडीतून अवैधरीत्या चंद्रपूर जिल्ह्यात जाणारा देशी व विदेशी दारुचा साठा व मुद्देमालासह गाडी जप्त करण्यात आली. मात्र गाडीचा वाहन चालक घटना स्थळावरून पसार झाला.
गाडीतील अवैध दारु व गाडी ही गोंदियाची असल्याचा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वृत्त लिहीपर्यंत आरोपीची नावे कळू शकली नाही. सदर प्रकरणातील गाडी व अवैध दारुची किंमत अंदाजे ५ लाख ५० हजार असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपारचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निलेश आडे, राम कोरे, सुभाष डोंगरवार, भिमसिंग चंदेल हे करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन चंद्रपूरकडे अवैध मार्गाने तस्करी केली जात आहे. डुग्गीपार पोलिसांनी नवेगावबांध मार्गावरील रस्त्यावर नाकाबंदी करण्याची गरज आहे.
 

Web Title:  An illegal liquor was caught in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.