तिरोडा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:29 AM2021-04-16T04:29:15+5:302021-04-16T04:29:15+5:30
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज चोरी होत असून याकडे याकडे महसूल विभागाचे ...
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज चोरी होत असून याकडे याकडे महसूल विभागाचे दुुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
तिरोडा तालुक्यात रेती, मुरुम, गिट्टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून व मोठ्या प्रमाणात रस्त्याचे, घराचे, सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु आहेत. पण रस्त्याच्या बांधकाम कामावर अवैध गौण खनिजाचा वापर केला जात. ४० ब्रॉसची रॉयल्टी व १००० ब्रॉस मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास यातील गौडबंगाल पुढे येईल. खदानीचे मोजमाप अधिकारी, आयुक्त यांनी केल्यास अवैध उत्खननाचे प्रकरण समोर येईल. रेतीचे प्रकरण, विना वाहन परवाना रेतीची डंम्पींग सुरु आहे. मध्यप्रदेशातून विटा मोठ्या प्रमाणात बोंडरांनी नाक्यावरुन येत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. याकडे तलाठी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.