अवैध सागवान चिरान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:46 PM2017-08-19T21:46:30+5:302017-08-19T21:46:49+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया सायगाव येथे वन विभागाने शुक्रवारी (दि.१८) दुपारी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचे चिरान (पाट्या).......

Illegal sewage chopped | अवैध सागवान चिरान जप्त

अवैध सागवान चिरान जप्त

Next
ठळक मुद्देवनविभागाची धाड : २ लाखांच्या मालासह आरोपी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया सायगाव येथे वन विभागाने शुक्रवारी (दि.१८) दुपारी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचे चिरान (पाट्या) जप्त करुन आरोपी रेवनाथ धर्मा गायकवाड यास वनविभागाने ताब्यात घेतले.
सायगाव येथे अवैधपणे सागवान चिरान असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले, श्वान मोबाईल वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम, नवेगावबांधचे प्रभारी वनपाल शेळवे, पठाण, बिसेन, मुंडे, काळसर्पे, मोहरुले, वनरक्षक राजगीरे, सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धाड मारण्यात आली.
यात सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सागवान चिरान जप्त करुन नवेगावबांध आगारात जमा करण्यात आले. आरोपी रेवनाथ धर्मा गायकवाड यास वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वन गुन्हा कलम ४१, ४२ (१) अंतर्गत कार्यवाही करुन वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Illegal sewage chopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.