जुनेवानी जंगलात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:16 PM2017-12-26T23:16:25+5:302017-12-26T23:18:57+5:30

इमारतींसाठी मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सागवान वृक्षांची राजोली सहवनक्षेत्रातील जुनेवानी भाग १ च्या कक्ष क्रमांक ३२७ मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची बाब उघकीस आली आहे. हा प्रकार महिनाभरापूर्वी घडल्याचे बोलल्या जाते.

Illegal slaughter of savory trees in the old forest | जुनेवानी जंगलात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

जुनेवानी जंगलात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

Next
ठळक मुद्देक्षेत्र सहायक व बीटरक्षकाचे संगनमत असल्याची चर्चा : चौकशी केल्यास सत्य बाहेर येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : इमारतींसाठी मौल्यवान समजल्या जाणाऱ्या सागवान वृक्षांची राजोली सहवनक्षेत्रातील जुनेवानी भाग १ च्या कक्ष क्रमांक ३२७ मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची बाब उघकीस आली आहे. हा प्रकार महिनाभरापूर्वी घडल्याचे बोलल्या जाते. एवढेच नव्हे तर जंगलात आरा लावून चिराण केल्याचे ही ऐकिवात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजोली सहवनक्षेत्रातील जुनेवानी भाग १ चे कक्ष क्रं.३२७ हे राखीव वन आहे. या परिसरात वनचोरीचे प्रमाण अधिक आहे. जंगलात चक्क आरा लावून चिराण तयार करण्याचा प्रकार संगनमतशिवाय होऊच शकत नाही असे बोलल्या जात आहे. वनतस्करांची एवढी मजल होईपर्यंत वनकर्मचारी गप्प कसे? हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. या प्रकरणात एका बीटरक्षकाने वनतस्करांना आरा घेऊन दिल्याचा आरोप आहे. जंगलातच सागवान वृक्षांची कत्तल करुन चिराण तयार करण्यात आले. नंतर हे चिराण गावातीलच एका पाटलाच्या घरी नेण्यात आले. कालांतराने हे स्थळ सुद्धा बदलण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहेत. या परिसरात असे एक ना अनेक प्रकार घडत असतात. इळदा बीटमधील कक्ष क्रं. ८५१ कोल्हासूर घाट या संरक्षीत वनात ट्रॅक्टरद्वारे अवैध खोदकाम होत असल्याची गुप्त माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली होती. वनकर्मचारी घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी अवैध खोदकाम करुन मातीने भरलेला ट्रॅक्टर क्रं. एम.एच.३५ जी ७८१६ हा दिसून आला होता. या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन त्याच्या चाब्या गोठणगावच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. संरक्षित वनात हे खोदकाम होऊनही हे प्रकरण महसूल विभागाकडे सोपविण्यात आले. त्यांनी सामान्य दंड आकारणी करुन त्या ट्रॅक्टरला सोडून दिले. संरक्षीत वनात ही कारवाई झाल्याने अवैध माती खोदकाम करणाऱ्यावर वनकायद्यानुसार कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र वनविभागाने हे प्रकरण महसूल विभागाकडे कसे सोपविले हा चर्चेचा विषय आहे.

इळदा बिटमधील कक्ष क्रं.८५१ कोल्हापूर घाट हे संरक्षीत वन आहे. यालगत एक नाला आहे. नाल्याच्या आतील भाग हा महसूल विभागाचा आहे. अवैध माती खोदकाम प्रकरणाचा पंचनामा वनविभागाने केला आहे. मात्र हे स्थळ महसूल विभागाकडे येत असल्याने प्रकरण त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. त्यांनी नियमानुसार दंड आकारणी केलेली आहे. हे स्थळ वनविभागांतर्गत नसल्याने वनविभागाने वनकायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ट्रॅक्टरच्या चाब्या वनपरिक्षेत्राधिकाºयांच्या सुपूर्द करण्यात आल्या नाही. तर त्या माझ्याकडे देण्यात आल्या होत्या.
- एफ.एस. पठाण
क्षेत्र सहाय्यक इळदा/राजोली

ही तक्रार मला प्राप्त झाली आहे. या संबंधाने चौकशी केली. यातील काही वृक्षतोड झालेली सागवान झाडे या बिटात आढळून आली नाहीत. एक जुना वाळलेला व वादळवाऱ्याने तुटलेला झाड दिसून आला. लोक तो जळाऊ, वापरासाठी घेऊन गेले व काही प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे या वनात अवैध वृक्षतोड झालेली नसून आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले.
- सी.जी.रहांगडाले
प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी गोठणगाव

Web Title: Illegal slaughter of savory trees in the old forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.