नदीपात्रालगतचा रेतीचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:23 PM2019-01-07T21:23:09+5:302019-01-07T21:23:45+5:30
तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोहळीटोला चिखली येथील रेती साठा जप्त केला. त्यानंतर या रेती साठ्याचा रविवारी (दि.६) लिलाव करण्यात आल्याची माहिती आहे.
या रेतीसाठ्याची लिलाव प्रक्रिया थांबवून चौकशी करुन अवैध उत्खनन करणाºयावर कारवाही करण्याची मागणीही चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे अवैध उत्खनन रात्रीच्या वेळेस करुन त्याची तस्करी केली जात होत होती. तसेच रेतीमाफीया दिवसा नदी पात्रातील रेतीचा उपसा करुन तो नदीपात्रालगत ढिग तयार करुन ठेवीत होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास या रेतीची तस्करी केली जात होते. पिपरीघाट, सौंदड, राका या घाटावर हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याबाबतची तक्रार संबंधित विभागाकडे करुन सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नव्हती. विशेष म्हणजे नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीसाठा जमा करुन ठेवण्यात आला असताना त्याची साधी चौकशी करण्याचे धाडस सुध्दा या विभागाच्या अधिकाºयांनी दाखविले नव्हते. तर तक्रारीनंतर सदर रेतीसाठा जप्त करुन ती लावारीस दाखविण्यात आली. तालुक्यातील सर्व रेती घाटांची पाहणी करून तिथे जमा करुन ठेवण्यात आलेल्या अवैध रेतीसाठ्याची चौकशी करुन दोषीवर कारवाही करुन दंड वसुल करण्याची मागणी चंद्रिकापुरे यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील अवैध रेती तस्करीच्या प्रकाराला पूर्णपणे आळा घालण्याठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बैठक घेवून एक समिती गठीत केली होती. तसेच रेती तस्करीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारीे व कर्मचाºयांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
तपासणी नाक्याचे काय?
रेती तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर दक्षता समित्या व काही ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात येणार होते. मात्र जिल्ह्यात रेती तस्करीचा प्रकार सुरूच असल्याने या तपासणी नाक्याचे काय झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे.