विटांची अवैध वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:19 PM2018-03-24T22:19:25+5:302018-03-24T22:19:25+5:30

परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांची मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहतूक सुरु आहे. गावपातळीवरील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे विटांच्या अवैध वाहतुकीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

Illegal traffic of brick continues | विटांची अवैध वाहतूक सुरूच

विटांची अवैध वाहतूक सुरूच

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : कारवाईची मागणी

आॅनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांची मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहतूक सुरु आहे. गावपातळीवरील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे विटांच्या अवैध वाहतुकीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.
बोंडगावदेवी परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांचा व्यवसाय जोरात सुरु आहे. मागील काही वर्षापासून विटांच्या वाहतुकीला परवानगी जरी लागत नसली तरी मात्र मातीपाूसन विटा तयार करण्याचा परवाना आवश्यक आहे. विटा तयार करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन मातीची परवानगी काढण्याची प्रक्रिया विटा व्यावसायीकांना पूर्ण करणे गरजेचे असते. बोंडगावदेवी परिसरात मातीपाूसन विटा तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून तहसील कार्यालयाकडून आवश्यक परवाना काही व्यावसायीकांनी मिळविला नसल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेले महसूल विभागाच्या कर्मचाºयांचे विटा व्यावसायीकांसोबत साटेलोटे असल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. मात्र यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एका आठवड्यापूर्वी बोंडगावदेवी येथील विटा भरुन वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर एका तलाठ्यांनी पिंपळगाव-खांबी येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पकडला.
मुख्य रस्त्यावर पकलडेल्या विटा भरलेल्या ट्रॅक्टर चालकास मातीपाूसन विटा तयार करण्याचा परवान्याची मागणी केली असता त्या ट्रॅक्टर चालकांनी त्यावेळी कोणतेही दस्तऐवज दाखविण्यास तत्परता दाखविली नाही. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर विटा भरलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला लावल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले. विटाची वाहतूक करताना संबंधित ट्रॅक्टर चालकाकडे मातीपासून विटा तयार करण्याचा परवाना बाळगणे आवश्यक आहे. विटा भरुन वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकाकडे कोणताही दस्तऐवज नसताना संबंधीत तलाठ्यांनी मोक्यावर केलेली कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. त्या ट्रॅक्टरवर कारवाई झाली की नाही याची माहिती तहसील कार्यालयालात सुद्धा उपलब्ध नाही. साटेलोटे असल्यामुळे मातीपासून विटा तयार करण्याचा परवाना ट्रॅक्टर चालक बाळगत नसताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. ज्या दिवशी तलाठ्यांनी पिंपळगाव येथे ट्रॅक्टर अडविला त्या दिवसापर्यंत मातीपासून विटा तयार करण्याचा परवाना परिसरातील विटा व्यावसायीकांनी हस्तगत केला नव्हता असे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Illegal traffic of brick continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.