बौद्ध धम्माचे अनुकरण करा

By admin | Published: February 25, 2016 01:36 AM2016-02-25T01:36:07+5:302016-02-25T01:36:07+5:30

जगातील अनेक देशात तथागत गौतम बुद्ध गेले नाही. त्या देशात बुद्धाचे तत्वाचे तंतोतंत पाळले जाते. भारतात जन्मलेले बौद्ध धम्म जगात विकसीत झाले.

Imitate Buddhist Dhamma | बौद्ध धम्माचे अनुकरण करा

बौद्ध धम्माचे अनुकरण करा

Next

वरठीत धम्म प्रवचन : भदन्त आर्यनाग थेरो यांचे प्रतिपादन
वरठी : जगातील अनेक देशात तथागत गौतम बुद्ध गेले नाही. त्या देशात बुद्धाचे तत्वाचे तंतोतंत पाळले जाते. भारतात जन्मलेले बौद्ध धम्म जगात विकसीत झाले. मात्र भारतात या धम्म लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. धम्माचा स्वीकार झाला, पण धम्माचे अनुकरण होत नाही. बौद्ध धम्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्ववतेच्या आधारावर केला. या धम्माचे अनुकरण म्हणजे दु:खापासून मुक्तता होय, असे प्रतिपादन भदन्त आर्यनाग अन्तदर्शी थेरो यांनी केले.
वरठी येथील सार्वजनिक बौद्ध विहार समितीच्यावतीने आयोजित बौद्ध धम्म प्रवचनात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, माजी सरपंच दिलीप गजभिये, मिलींद धारगावे, देवीदास डोंगरे, प्रमोद वासनिक, सुदर्शन डोंगरे, विवेक गणवीर, कीशोर बौद्ध, धर्मशिला उके, मनिषा मडामे, दमयंता वासनिक, वंदना लोणारे, सत्यवती मेश्राम, हीतेद्र नागदेवे, रमेश रामटेके, मंजु रामटेके, मोतीलाल वासनिक, नंदकुमार लोणारे, उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, भारतीय जीवणात मोठ्या प्रमाणात असमतोल आहे. भारतातील स्त्रि कौटुबिक सुख-साधनाचा विचारास प्राधान्य देते. जगातील इतर देशातील स्त्रिया चंद्रावर जाण्याचा विचार करतात. या असमतोल विचारामुळे स्त्रियांचे जीवनमान उंचावत नाही. स्त्रि-पुरुष समानता, जाती-धर्म भेद या संकल्पना विचारात ठेवल्याने होणार नाही तर त्या अंमलात आणाव्या लागतील. याकरीता बौद्ध धम्माचे अनुकरण करणे हा एकमेव पर्याय आहे. माणसाच्या दुख: चे निराकरण बौद्ध धम्मात आहे. या धम्मात देव पावत नाही पण दु:खाचे मुळे माणसाच्या स्वार्थात लपले असल्यामुळे त्यापासून परावृत्त होण्याचा मार्ग दाखवतो. संचालन शरदचंद्र वासनिक यांनी तर आभार देवीदास डोंगरे यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Imitate Buddhist Dhamma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.