संविधानाची होळी करणाऱ्यांना त्वरीत अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:29 AM2018-08-18T00:29:38+5:302018-08-18T00:31:33+5:30

Immediately arrest the Holi of the Constitution | संविधानाची होळी करणाऱ्यांना त्वरीत अटक करा

संविधानाची होळी करणाऱ्यांना त्वरीत अटक करा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : तहसीलदारांना निवेदन, ठिकठिकाणी निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भारतीयांचा मान, सन्मान,गौरव व विविध जाती धर्माच्या लोकांना, राज्यकर्त्यांना योग्य न्याय व हक्क प्रदान करणाऱ्या मनुवादी मानसिकतेच्या काही कार्यकर्त्यानी ९ आॅगस्टला जंतर मंतर दिल्ली येथे पोलीस यंत्रणेसमोर भारतीय संविधानाची जाहीर होळी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत कारवाई करुन अटक करण्यात यावी. अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली.
या वेळी दिलेल्या निवेदनातून भारताचे स्वातंत्र्य, संविधान, राष्ट्रध्वजासाठी हजारो भारतीय व शूर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र काही विकृत मानसिकेतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी करुन देशद्रोही कृत्य केले. अशा देशद्रोहींना त्वरीत अटक करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी दिला. शिष्टमंडळात माजी आ.दिलीप बंसोड, माजी म्हाडा सभापती नरेशकुमार माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प.सदस्य सुकराम फुंडे, राजेश भक्तवर्ती रविंद्र मेश्राम, महिला अध्यक्ष कविता रहांगडाले, विद्यार्थी सेल अध्यक्ष प्रफुल ठाकरे, महामंत्री देवेंद्र मच्छिरके, मुक्तानंद पटले, सचिव संतोष श्रीखंडे, संजय रावत, रवी क्षिरसागर, निखिल पशिने, प्रमोद शिवणकर, सिताराम फुंडे, शिवचरण शिंगाडे, रमन डेकाटे, उमेश भोंडेकर, राहुल रामटेके, तुंडीलाल कटरे, मयूर मेश्राम, अनिल चोखांद्रे, केशव भिमटे, मनोज डोंगरे, शिला हजारे, टिकाराम मेंढे, अजय बिसेन, संतोष रहांगडाले, प्रकाश राऊत, किशोर रहांगडाले, गेंदलाल यावलकर यांचा समावेश होता.
संविधान जाळणाºयांवर त्वरित कारवाई करा
आमगाव : दिल्ली येथील जंतर मंतर येथे ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर काही समाज विरोधी कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या संपूर्ण प्रकराचा येथील समाजबांधवानी निषेध नोंदविला. संविधानाचा अपमान करणाºया कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो विरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असे असताना काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी भारतीय संविधानाची होळी करण्याचे देशद्रोही कृत्य केले. भारतीय संविधानाला जाळणाºया व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या विकृत मानसिकतेच्या समाजकंटकाविरोधात प्रिव्हेशन आॅफ इन्सल्ट आॅफ नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट १९७१ अ‍ॅन्ड १०२४ ए आयपीसी नुसार कार्यवाही करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात भारतीय बौद्ध महासभेचे भरत वाघमारे, बामसेफ कर्मचारी संघटनेचे मिलिंद पंचभाई, समता सैनिक दलाचे आनंद बन्सोड, हलबा हलबी आदिवासी संघटनेचे वाय. सी. भोयर, भीम गर्जना संघटनेचे निखिल मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव राजेंद्र सांगोळे, शिक्षक भारतीचे प्रकाश ब्राम्हणकर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष विनायक येडेवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संदिप मेश्राम, यंग मुस्लिम विकास कमिटीचे मुस्ताकभाई व वाय.के. रामटेके उपस्थित होते.
त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
देवरी : ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतर मंतरवर काही असामाजिक तत्वांच्या लोकांनी संविधानाच्या विरोधात घोषणा देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच संविधानाच्या प्रती जाळल्या. हे देश विरोधी कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन येथील मुलगंध कुटी बौद्ध विहार कमिटी व तालुक्यातील बौद्ध समाजबांधवांतर्फे देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांना दिले.
शिष्टमंडळात मुलगंध कुटी बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष राजू देशपांडे, उपाध्यक्ष मधू शहारे, सचिव भाऊराव रंगारी, कोषाध्यक्ष राजू मडामे, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, महिला व बाल कल्याण सभापती सीता रंगारी, नगरसेविका भूमिका बागडे, प्रतिमा देशपांडे, माधुरी मेश्राम, वसुधा देशपांडे, तारेश मेश्राम, रुपचंद जांभुळकर, गोपाल राऊत, प्रदीप रामटेके, मधुकर साखरे, सुरेंद्र कानेकर, प्रशांत उके, प्रशांत मेश्राम, महेश अंबादे, सुबोध देशपांडे, बन्सोड, खोब्रागडे यांचा समावेश होता.

Web Title: Immediately arrest the Holi of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा