शेतकºयांना तातडीने मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:21 PM2017-09-14T22:21:51+5:302017-09-14T22:22:07+5:30
कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील शेतीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकºयांना मदत व उपाययोजना करण्यात याव्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील शेतीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकºयांना मदत व उपाययोजना करण्यात याव्या. याबाबतचे निवेदन आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या वेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बडोले, आमदार चरण वाघमारे, आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंह नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
निवेदनातून, गोंदिया जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतकºयांची फक्त ५० टक्के रोवणी झाली असून ५० टक्के शेती पडीक आहे. तसेच माहे आॅगस्ट अखेर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील तलाव व धरणांमध्ये २० टक्के पाणीसाठा असून जिल्ह्याला दुष्काळाबरोबर अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रोवणी न झाल्यामुळे पडीक जमिनीवर दुबार पीक घेण्याकरिता शासनाच्यावतीने चना, गहू, उळीद, पोपट, मुंग ईत्यादी कडधान्याचे बियाणे उपलब्ध करुन देणे, शेतकºयांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एमआरईजीएसची कामे सुरु करण्याकरिता नियोजन करण्यात यावे व निधी उपलब्ध करुन द्यावा, शेतकºयांना निर्माण होणाºया चारा टंचाईकरिता शासनाच्यावतीने चारा छावणीची व्यवस्था करण्यात यावी. कमी पर्जन्यमानाने पाणी टंचाई निर्माण होणार असल्याने याकरिता उपाययोजना करण्यात यावी, शेतकºयांना अनुदानात अन्न पुरवठा करण्यात यावा. सानुग्रह अनुदान देण्यात यावा, विशेष म्हणजे शेतकºयांनी व्यक्तीश: काढलेल्या पीक विमा योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा, ३१ जुलै पर्यंत लागवड झालेले गोंदिया-भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी लागवड झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेकरिता जे शेतकरी पात्र आहेत. परंतु विमा कंपनीने अजूनही दखल घेतली नाही. अशा शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा आदि मागण्यांचा समावेश आहे.