दुष्काळी स्थितीत उपाययोजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:14 AM2017-10-07T01:14:01+5:302017-10-07T01:14:12+5:30

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे. तर शेतकरी शेतमजूर यांच्या हाताला काम नाही.

 Implement the drought situation | दुष्काळी स्थितीत उपाययोजना राबवा

दुष्काळी स्थितीत उपाययोजना राबवा

Next
ठळक मुद्देविजय रहांगडाले : जिल्ह्यातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे. तर शेतकरी शेतमजूर यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन उपाय योजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याशी यांच्याकडे केली.
आ. रहांगडाले, आ. संजय पुराम, आमगावचे माजी आ. भैरसिंह नागपुरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. तसेच तात्काळ उपाययोजना करावी व रोजगार हमीची कामे सुरू करण्याचे े आदेश देण्याची मागणी केली.
आंबेनाल्याचा विकास मागील ४४ वर्षांपासून प्रलंबित होता. आ. रहांगडाले यांनी आंबेनाला जलाशयासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच खळबंदा जलाशयात नुकतेच पाणी घातले. सन २०१४ मध्ये ते निवडून आल्यानंतर दीड वर्षात विकासकामे मंदावली होती. त्यामुळे जनतेत थोडीफार नाराजी होती. ही नाराजी दूर व्हावी यासाठी त्यांनी कंबर कसली व ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष देणे सुरू केले.
मागील दोन वर्षात चोरखमारा पर्यटन विकासासाठी शासनाकडून १४ कोटी रूपये मंजूर करवून घेण्यात यश मिळविले. सन १९९५ पासून रखडलेल्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाकरिता (टप्पा-२) १०० कोटी मंजूर करविण्यात आले. टप्पा-२ चे काम बोदलकसा व चोरखमारा येथे पाणी घालण्याकरिता येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे काम पूर्णत्वाकडे असून खळबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे कार्य सुरू झाले आहे. त्यामुळे खळबंदा, सेजगाव, दवनीवाडा, सहेजपूर, सोनेगाव, बेरडीपार व अनेक गावांतील शेतकºयांना लाभ मिळाला आहे. या व्यतिरिक्त रहांगडाले यांनी केरझरा विकासाकरिता सहा कोटी रूपये मंजूर करवून घेतले. तिरोडा शहरातील जीर्ण व मागासलेले पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या नवनिर्मितीसाठी दोन कोटी ६५ लाखांचा निधी शासनाकडून खेचून आणला. त्यामुळे पोलीस विभागात आनंदाचे वातावरण आहे.
तिरोडा शहरात पाणी पुरवठा योजनेकरिता शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. त्यासाठी शासनाने २५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे तिरोडा शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असून नागरिकांनी आमदारांचे आभार मानले.निमगाव (आंबेनाला) लघू सिंचन प्रकल्पाचे काम ४४ वर्षांपासून रखडले होते. त्यासाठी आ. रहांगडाले यांनी सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. वनविभागाची असणारी देय रक्कम भरण्यासाठी शासनाच्या मंजुरीकरिता २०१६ पासून प्रकरण विचाराधिन होते.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची दिली माहिती
यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जलाशयांमध्ये अत्यल्पपाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर उन्हाळी पिके घेणे सुध्दा शक्य होणार नाही. पावसाअभावी खरीपातील धानाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत दुष्काळ सदृश्य पाहता उपाय योजना राबविण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले
दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी
तिरोडा तालुक्यातील दक्षिण भागात मागील दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहेत. यावर्षी जि.प. सरांडी क्षेत्र, वडेगाव क्षेत्र, सुकडी व चिखली क्षेत्रात पावसाअभावी रोवण्या लागल्या नाही. अशात आ. रहांगडाले यांनी चिंतातूर शेतकºयांच्या शेतात जावून पिकांची पाहणी केली. तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले
 

Web Title:  Implement the drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.