आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:49 PM2019-03-11T21:49:10+5:302019-03-11T21:49:42+5:30

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता १० मार्चला सायंकाळपासून आचार संहिता लागू झाली आहे. ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.११) सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी व राजकीय पक्षांची बैठक घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याचे निर्देश दिले.

Implement the Model Code of Conduct effectively | आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा

आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : सर्व शासकीय विभागप्रमुख व राजकीय पक्षांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता १० मार्चला सायंकाळपासून आचार संहिता लागू झाली आहे. ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.११) सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी व राजकीय पक्षांची बैठक घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत जिल्हाधिकारी बलकवडे यांनी उपस्थितांना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचना देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कामासाठी वापर केला जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर, व झेंडे काढून घेण्याची सूचना सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आली. तसेच त्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. आदर्श आचार संहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून होणार नाही याची कटाक्षाने घेण्यास सांगितले. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यसाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज असून आगामी निवडणूका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यात येईल. बैठकीला मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, पोलीस उपअधीक्षक गृह सोनाली कदम,उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड, जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हान, जिल्हा प्रशासन अधिकारी व पालिका प्रशासन विनोद जाधव, सहायक अधीक्षक आर.एम.पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, नायब तहसीलदार प्रविण जमधाडे, तसेच राजकीय पक्षाचे जयंत शुक्ला,अशोक चौधरी, केतन तुरकर, अजय गौर उपस्थित होते.
टोल फ्री क्रमांकावर समस्यांचे निराकारण
लोकसभा निवडणुकी संदर्भात मतदारांना काही अडचण अथवा शंका असल्यास किंवा तक्रार करावयाची असल्यास १९५० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन करता येणार आहे. तसेच यासाठी एक संकेतस्थळ देखील तयार करण्यात आले असून यावर सुध्दा तक्रार करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्र ारीसाठी मोबाईल अ‍ॅप
या निवडणूकीत नागरीकांना निवडणुकी संदर्भात तक्रारीसाठी सीव्हीजील मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. सदर एप्लीकेशनमध्ये रजिस्टर करु न तक्र ारदार हे लाईव्ह व्हिडीयो तथा फोटो अपलोड करु न तक्र ार करु शकतात. प्राप्त तक्र ारीनंतर १०० मिनिटामध्ये कार्यवाही करण्यात येईल. तसेच तक्र ारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सूचना वेळो-वेळी देण्यात येईल. तक्रार करणाऱ्या नागरीकांचे नाव गुप्त ठेवण्यासाठी सदर अ‍ॅपमध्ये सुविधा ठेवण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा
लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि दिव्यांगांना मतदान केंद्रावर कुठलीही अडचण होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअर व त्यांच्या मागणीनुसार सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Implement the Model Code of Conduct effectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.