नाथजोगी समाजातील महत्त्वपूर्ण घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:19 AM2018-12-06T00:19:16+5:302018-12-06T00:20:53+5:30
तालुक्यातील अदासी येथील नाथजोगी समाजाच्या वसाहतीच्या विकासासाठी शासनाने ८८ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच या वसाहतील २० कुटूंबांना पहिल्या टप्प्यात घरकुल देखील मंजूर केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील अदासी येथील नाथजोगी समाजाच्या वसाहतीच्या विकासासाठी शासनाने ८८ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच या वसाहतील २० कुटूंबांना पहिल्या टप्प्यात घरकुल देखील मंजूर केले आहे. बऱ्याच वर्षांपासून येथील नाथजोगी समाजबांधवांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र ते देखील समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून त्यांना हक्काचा निवारा आणि पायाभूत सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन नाथजोगी समाजबांधवाच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल त्यांनी अग्रवाल यांची भेट घेवून आभार मानले. या वेळी ते बोलत होते. नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८८ कोटी ६३ लाख रूपयांच्या निधीतून वसाहतीत पाणी पुरवठा योजना, सिमेंट रोड, विद्युत व्यवस्था, २० कुटुंबांना घरकुल, समाज भवन यासह पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा समाज मागील २० ते २५ वर्षांपासून शासनाच्या सर्व सोयी सुविधांपासून वंचित होता. राहण्यासाठी पक्के घर नसल्याने त्यांना उघड्यावर राहावे लागत होते. आ.अग्रवाल यांनी याची दखल घेवून त्यांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी संतोष तांबू, रविंद्र पंधरे, निर्मला बहेकार, रोहीणी रहांगडाले, विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, किसननाथ तांबू, राजेश्वर बाबर,रतनलाल चव्हाण,मंसाराम चव्हाण, व्दारकानाथ शिंदे, कालानाथ तांबू, नरसिंगनाथ तांबू, अप्पानाथ शिंदे, घनसुर शिंदे, सुरेश तांबू, गोपी बाबर, दुर्योधन बालनाथ, तानुनाथ मांडोकर, विजय चव्हाण, आनंद मालवे, एकनाथ शिंदे, मोहन मांडोकर,जंगलू शिंदे,बाबुलाल कोष्टा उपस्थित होते.