सर्व शिक्षकांना वार्षिक वेतनवाढ लावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:56+5:302021-08-12T04:32:56+5:30
सडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा सडक अर्जुनीच्यावतीने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन शिक्षक समितीच्या ...
सडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा सडक अर्जुनीच्यावतीने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना घेऊन शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम, विस्तार अधिकारी सुभाष बागडे, वरिष्ठ सहायक हटवार यांच्यासोबत शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
चर्चेमध्ये जुलै महिन्याच्या वेतनात सर्व शिक्षकांना वार्षिक वेतनवाढ लावणे, सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चितीसाठी सर्व शिक्षकांच्या सेवा पुस्तिका एकाच वेळी केंद्रनिहाय वित्त विभाग जिल्हा परिषद गोंदियाला मान्यतेसाठी पाठवणे, २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव अविलंब निवड श्रेणीसाठी जिल्हा परिषदला पाठवणे, जुलै महिन्यात मंजूर झालेल्या निवड श्रेणी शिक्षकांचे प्रस्ताव वेतन मान्यतेसाठी पाठविणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक वेतनातून काढणे, सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करणे, जीपीएफ व डीसीपीएसधारक शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा दुसरा हप्ता शासन निर्णयानुसार ऑगस्ट व सप्टेंबरच्या वेतनात देणे, पंचायत समितीमध्ये प्रलंबित इतर देयक निकाली काढणे, प्राथमिक शिक्षकांच्या वैयक्तिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ते सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. चर्चेत शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, तालुकाध्यक्ष प्रदीप बडोले, तालुका सरचिटणीस महेश कवरे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश मेश्राम, जयंत रंगारी, तालुका नेते जी. आर. गायकवाड, जी.जे.कापगते, बी.के.चांदेकर, कोषाध्यक्ष आनंद मेश्राम, भास्कर मुंगमोडे, डी.एन.वाडीभस्मे, जीवन म्हशाखेत्री उपस्थित होते.