कापूर, निलगिरी तेलाच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:30 PM2017-09-29T23:30:45+5:302017-09-29T23:30:57+5:30

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे.

 Improved demand for camphor, Nigluri oil | कापूर, निलगिरी तेलाच्या मागणीत वाढ

कापूर, निलगिरी तेलाच्या मागणीत वाढ

Next
ठळक मुद्दे नागरिकांनी घेतली स्वाईन फ्लूची धास्ती : उपाययोजनांचा अभाव

हितेश रहांगडाले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे. आरोग्य प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनीच स्वाईन फ्ल्यूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कापूर व निलगिरी तेलाचा वापर सुरू केला आहे.
आठ दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील तीन जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जनता सावध झाली आहे. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्या जाणाºया निलगिरी तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
याबाबद निलगिरी तेलच्या होलसेल विक्रेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी तेलाची महिन्याला साधारणत: १५ हजार बॉटल्सची मागणी असायची. आता ही मागणी तिपटीने वाढून ४५ हजार बॉटल्सवर पोहचली आहे. एवढेच नव्हे तर साधारणत: १६ रुपये किंमतीला येणारी पाच मिली निलगिरी तेलाची किंमत वाढून २५ रुपये करण्यात आली. शिवाय छोट्या बॉटलची मागणी वाढल्यामुळे औषधी दुकानात त्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांना ५० ते १०० रुपये किमंतीचा निलगिरी तेल खरेदी करावे लागत आहे.
स्वाईन फ्लू प्रतिबंधक समजल्या जाणाºया कापूरच्या मागणीत वाढ झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचारी, कामावरील मजूरवर्गही सोबत कापूर बाळगत आहेत. परिणामी ५०० रुपये किलोने मिळणाºया कापराची किंमत ७०० रुपयांपेक्षा अधिक झाल्याची माहिती आहे.
कापराची मागणी वाढण्यास नवरात्रोत्सव हे एक कारण असले तरी स्वाईन फ्लूच्या भीतीनेही कापूर विक्रीत वाढ झाली आहे. सोबत विलायचीसुद्धा नेली जात आहे.
‘तो’ रुग्ण स्वाईन फ्लूचा नाही
तिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील नयन नंदकिशोर राघोर्ते (२) हा रुग्ण संशयीत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. परंतु डॉक्टरांनी सर्व तपासण्या करुन सदर रुग्ण स्वाईन फ्लूचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो सध्या स्वस्थ असून रुग्णालयातून त्याला सुट्टी देण्यात आली आहे.
आरोग्य प्रशासनाची बघ्याची भूमिका
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार वाढत असताना अद्यापही व्यापक स्वरुपात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरूवात केलेली नाही. लोकांमध्ये जनजागृती करण्याकडेसुध्दा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
आवाहन करुन झटकले हात
स्वाईन फ्ल्यूचा प्रसार नेमका कशामुळे होते. तो होवू नये यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासंबंधीचे चार ओळींचे पत्रक काढून आरोग्य विभागाने हात झटकले आहे. अद्यापही ग्रामीण भागात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप सुरू केले नसून आरोग्यसेवकसुध्दा भटकत नसल्याचे चित्र आहे.
शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावली
तिरोडा तालुक्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण दगावल्यामुळे सर्वत्र सावधगिरीचे वातावरण आहे. शाळांमध्ये दररोज असणारी विद्यार्थी उपस्थिती रोडावल्याची स्थिती आहे. स्वाईन फ्लू एक संसर्गजन्य व गर्दीच्या ठिकाणी पसरणारे रोग असल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांनी तोंडावर रुमाल ठेऊन अध्ययन अध्यापन कार्य केले. विशेष म्हणजे सर्दी, ताप, घसा दुखणे ही स्वाईन फ्लूची मूळ लक्षणे असल्यामुळे असा त्रास असणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून मधातच सुट्टी देऊन घरी राहणे व औषधोपचाराचा सल्ला दिला जात असल्याची माहिती आहे.
 

Web Title:  Improved demand for camphor, Nigluri oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.