मनरेगाच्या घरकुल प्रणालीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:05+5:302021-05-05T04:48:05+5:30

अर्जुनी मोरगाव : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने घरकुलांचे टप्पानिहाय हप्ते मनरेगाच्या मस्टर जनरेशनला जोडले होते. आवास सॉफ्टवर जोवर ...

Improvement of MGNREGA housing system | मनरेगाच्या घरकुल प्रणालीत सुधारणा

मनरेगाच्या घरकुल प्रणालीत सुधारणा

Next

अर्जुनी मोरगाव : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने घरकुलांचे टप्पानिहाय हप्ते मनरेगाच्या मस्टर जनरेशनला जोडले होते. आवास सॉफ्टवर जोवर घरकुलांच्या हप्त्याची पतनिश्चिती येत नव्हती तोवर मनरेंगाचे हजेरीपट जनरेट करता येत नव्हते. यामुळे घरकुल तयार करण्यास समस्या येत होती. आता टप्पेनिहाय हजेरीपत्रक न काढता पूर्वीप्रमाणेच एफटीओ जनरेशनवर ठेवण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांची अडचण दूर होणार आहे. या निर्णयाचे माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी स्वागत केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलांच्या कामाकरिता अकुशल भाग म्हणून ९० दिवस मजुरी प्रदान करण्यात येत होती. घरकुलांच्या कामांचे हजेरीपत्रक निर्गमित करताना शासनाने चार टप्पे आखून दिले होते. त्यानुसार अनुदान वितरणानंतर टप्पेनिहाय हजेरीपत्रक निर्गमित केले जात होते. या प्रणालीत सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार सद्यस्थितीत शासनाने घरकुलांचे हजेरीपत्रक निर्गमित करण्याकरिता एफटीओ जनरेट केल्यावर करता येतील अशी सोय करून दिली आहे. ज्या लाभार्थ्यांचे हजेरीपत्रक निर्गमित करण्यात आले नाहीत त्यांचे हजेरीपत्रक त्या आर्थिक वर्षातील मजुरीनुसार निर्गमित करावे हा संदेश सरपंच, सचिव व ग्राम रोजगार सेवकांना कळविण्याचे पत्र गोंदिया जि.प.चे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक दिनेश हरिणखेडे यांनी ३ मे रोजी काढले आहेत.

यासंदर्भात राज्य ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी २० एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या महा-आवास अभियान (ग्रामीण) मधील उपक्रमांच्या आढावा बैठकीत यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

.....

जनतेच्या हिताचा निर्णय -गंगाधर परशुरामकर

शासनाने घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे. या निर्णयामुळे जनतेची होणारी अडचण दूर झाली आहे. अधिक लवचीकता व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक कष्ट करावे लागत होते ते यापुढे करावे लागणार नाहीत. या निर्णयाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी दिली.

Web Title: Improvement of MGNREGA housing system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.