इमरान खानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:02 PM2019-02-15T22:02:56+5:302019-02-15T22:03:48+5:30

४४ जवानांचा जीव घेणाऱ्या पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा बजरंग दलने निषेध नोंदविला. यांतर्गत बजरंग दल कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी नेहरू चौकात पाकिस्तानचा प्रधानमंत्री इमरान खान याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

Imran Khan's symbolic statue was burnt | इमरान खानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

इमरान खानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Next
ठळक मुद्देपुलवामा येथील घटनेचा निषेध : बजरंग दलने दिली शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ४४ जवानांचा जीव घेणाऱ्या पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा बजरंग दलने निषेध नोंदविला. यांतर्गत बजरंग दल कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी नेहरू चौकात पाकिस्तानचा प्रधानमंत्री इमरान खान याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच भारतमातेची आरती करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जम्मूहून श्रीनगरला जात असताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर पुलवामा येथे गुरूवारी (दि.१४) दहशतवादी आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले असून देशात सुरक्षा जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.
या भ्याड हल्ल्याचा येथील बजरंग दलने निषेध नोंदवित शुक्रवारी (दि.१५) सकाळी नेहरू चौकात पाकिस्तानचा प्रधानमंत्री इमरान खान याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर, चौकातच भारतमातेची आरती करून शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र-गोवा प्रभारी देवेश मिश्रा, भीकम शर्मा, मनोज मेंढे, महेंद्र देशमुख, अनील हुंदानी, सचिन चौरसिया, प्रमोद सहारे, दिलीप रक्शे, मुकेश उपराडे, हरिष केशवानी, अंकीत कुलकर्णी, विशाल शुक्ला, आशिष कटरे, बबलू गभने, राजेश दमाहे, अनील तिवारी, बंडू सातव, अंकीत डोये, मुकेश नागपूरे, महेंद्र नागपुरे, बसंत ठाकूर, गोविंद अग्रवाल, मनोज पारेख, पुरूषोत्तम मोदी, संजय जैन, बाबा पांडे, राजेश कनोजिया, दुर्गेश रहांगडाले, हर्षल पवार, अमित झा, रवी हलमारे, बंटी मिश्रा, प्रकाश शिवणकर, भारत शुक्ला, पिंटू गिºहे, राजेश कोरे, जय चौरसिया, सुभाष असाटी, दीपक कदम, सतीष चव्हाण, प्रशांत बोरकुटे, गणेश जागजोड व अन्य उपस्थित होते.

Web Title: Imran Khan's symbolic statue was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.