धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:26 AM2021-03-14T04:26:57+5:302021-03-14T04:26:57+5:30

मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. नायडू यांनी, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना आपले आदर्श मानून त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करावे ...

Inauguration of Amrut Mahotsav of Indian Independence at Dhote Bandhu Science College | धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा शुभारंभ

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा शुभारंभ

Next

मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. नायडू यांनी, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना आपले आदर्श मानून त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करावे तसेच आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रत्येक पान वाचावे असे सांगितले.

कार्यक्रमाला वक्ते म्हणून सहायक प्राध्यापक डाॅ. सोमनाथ कदम यांनी उपस्थितांसमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जिवंत रूपाने सादर केला. त्यांनी १८५७ चा उठाव, महात्मा गांधींचे अहिंसा आंदोलन, चले जाव चळवळ , लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आणि हुतात्म्यांचे बलिदान इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन सिस्को वेबेक्स या आभासी व्यासपीठावर करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक मांडून संचालन कार्यक्रम समन्वयिका डाॅ. शुभांगी नरडे-धोपटे यांनी केले. आभार महाविद्यालयाचे प्राध्यापक धरमवीर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. संजय तिमांडे, डाॅ. दिलीप चौधरी व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Inauguration of Amrut Mahotsav of Indian Independence at Dhote Bandhu Science College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.