सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:47 PM2019-07-31T23:47:03+5:302019-07-31T23:47:23+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयातील सीबी नॅट मशिनचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of CB-Nat Machine | सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण

सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण

Next
ठळक मुद्दे परिणय फुके : मशिनमुळे होणार अचूक क्षयरोग निदान

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : येथील ग्रामीण रुग्णालयातील सीबी नॅट मशिनचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी मंत्री आ.राजकुमार बडोले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.सदस्य शिला चव्हाण, रचना गहाणे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, पं.स.उपसभापती राजेश कठाणे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर, तहसीलदार उषा चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक धुमनखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षवर्धन मेश्राम, बालरोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते. सेंट्रल टीबी डिव्हीजन, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि आशाकल्प हेल्थ केअर असोशिएशन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वतीने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व अतिदुर्गम अशा देवरी, सालेकसा,सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव आणि लगतच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील नागरिकांना क्षयमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयात अंदाजे ३० लाख रुपये किंमतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या सीबी-नॅट मशिन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनतेचे क्षयरोग निदान व उपचार करणे सोईचे होणार असल्याचे परिणय फुके यांनी सांगितले. क्षयमुक्त भारत अभियानाकडे एक पाऊल पुढे जाऊन सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.

Web Title: Inauguration of CB-Nat Machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.