गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस, सिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे उघडले
By अंकुश गुंडावार | Updated: September 12, 2022 11:27 IST2022-09-12T11:26:22+5:302022-09-12T11:27:49+5:30
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस, सिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे उघडले
गोंदिया : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात रविवारपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणाच्यापाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. देवरी तालुक्यातील सिरपूरबांध धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या धरणाचे ७ दरवाजे सोमवारी सकाळी ९ वाजता उघडण्यात आले. यामधून 180.34 क्युमेक (6370 क्युसेक) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासोबतच नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
जलाशयात येणारा विसर्ग पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या खालील दिलेल्या मदतकेंद्र क्रमांकावर संपर्क करावा.
आजची जलाशय पातळी : 349.97
उपयुक्त पाणीसाठा : 151.989 दलघमी
उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : 95.12%
विसर्ग - 180.34cumec ( 6370 क्युसेक ) पर्यंत विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.