शासकीय सेवेत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 09:49 PM2017-10-20T21:49:10+5:302017-10-20T21:49:39+5:30
शासकीय सेवेत त्वरीत समाविष्ट करा, यासह अन्य मागण्यांसाठी येथील अनुकंपाधारक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपजिल्हाधिकाºयांंमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शासकीय सेवेत त्वरीत समाविष्ट करा, यासह अन्य मागण्यांसाठी येथील अनुकंपाधारक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपजिल्हाधिकाºयांंमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून शासकीय सेवेत समाविष्ट करा या मागणीसह, अनुकंपनाचा हक्का देण्यात यावा, यादीतील घोळ दूर करून नवीन यादी तयार करावी, ४५ वर्षे वय होणाºया लाभार्थ्यांच्या वारसदाराचे नाव यादीत समाविष्ट करावे, लाभार्थ्यांचे वाढलेले शिक्षण वेळीच यादीत नमूद करावे जेणेकरून त्या लाभार्थ्याला शासकीय सेवा भर्ती वेळी त्याच्या शिक्षणाचा लाभ मिळावा आदि मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांचे निवेदन समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रभाकर गावंडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले.
मागण्यांची त्वरीत पूर्तता न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून संघटनेने दिला आहे. समितीच्या शिष्टमंडळाते अध्यक्ष संजय हत्तीमारे, कार्यकारी अध्यक्ष भोला गुप्ता, संदीप मानकर, संजय शहारे, घरडे, श्रीकांत बडोले, रसीका राऊत, अविनाश शिवणकर, योगेश पटले, सुमीत वैद्य, होमेश्वर कटरे, सुरेश गौतम यांच्यासह आठही तालुक्यातील प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.