शौर्य दिनाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करा
By admin | Published: January 9, 2016 02:17 AM2016-01-09T02:17:03+5:302016-01-09T02:17:03+5:30
‘शौर्य दिनाचा इतिहास’ अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. पण हा इतिहास पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावे,
अनिल दहिवले : भीमशक्ती संघटनेचे मागणी
बाराभाटी : ‘शौर्य दिनाचा इतिहास’ अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. पण हा इतिहास पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावे, असे प्रतिपादन भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल दहिवले यांनी केले.
दाभना येथे मंगळवारी ५ जानेवारीला प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे प्रस्तुत प्रशिक गु्रप नागपूरद्वारे ‘एक रात्र निळ्या नभाखाली’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अर्जुनी-मोरगावचे पं.स. सभापती अरविंद शिवणकर होते. अतिथी म्हणून सहायक गटविकास अधिकारी जाधव, प्रशांत मेश्राम, प्रा.टी.एस. माटे, डॉ. प्रदीप भानसे, रत्नदीप दहिवले, विजय लाडे, कल्पना सांगोळे, सतीश मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव दहिवले, सचिन खोब्रागडे, मिनल खोब्रागडे, मनोहर बोरकर, किर्तीवधीन मेश्राम, जगझापे, एम.एल. नंदागवळी, प्रधान, नगरसेविका जुगनाके, तंमुसचे अध्यक्ष अरविंद गोंडाणे, शैलेष तागडे, जांभुळकर, गोविंदराव बोरकर, किशन बोरकर उपस्थित होते.
या वेळी सचिन खोब्रागडे, मिनल खोब्रागडे या पोलीस खात्याच्या दांपत्याचा संविधान देवून सत्कार करण्यात आला. किर्तीवर्धन मेश्राम यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आजूबाजूच्या आंबेडकरवादी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
याप्रसंगी माटे यांनी पेशवाईपासून तर संत, महात्मे, महापुरुष यांच्या चारित्र्यावार उत्कृष्ठ समाजाला दिशा देणारे मागदर्शन केले. संचालन विपिन मेश्राम, प्रास्ताविक अरविंद गोंडाणे आणि आभार मानले. कार्यक्रमासाठी कोसे, खोब्रागडे, गोंडाणे, मेश्राम व सर्व गावकरी बांधवांनी सहकार्य केले. (वार्ताहर)