कचºयाच्या विक्रीतून घेतले उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:04 PM2017-10-11T23:04:07+5:302017-10-11T23:04:37+5:30
येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर परिषदेने आदर्श ठेवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर परिषदेने आदर्श ठेवला आहे.
शहरातील कचरा दररोज गोळा करुन हलबीटोला येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पाठविला जातो. तिथे पॉलीथीन, काच, प्लास्टीक, खरडा, वेगवेगळे केले जाते. जमा झालेल्या विविध कचºयाला कबाडी साहित्याचा व्यवसाय करणाºया त्याची विक्री केली जाते. असे न.प. उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगितले. गोरेगाव नगर परिषदेने मागील काही महिन्यात जमा झालेल्या कचºयाची विक्री करुन ८ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्न वाढविण्यास मदत झाली. स्वच्छतेचे कार्य जर गांभीर्याने केले तर शहरात स्वच्छता तर दिसेलच, शिवाय उत्पन्न ही वाढविले जावू शकते, हे न.प.गोरेगाव ने सिद्ध केले आहे.
सोशल मीडियाची मदत
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. केरकचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला.याला शहरवासीयांचा सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अध्यक्षा सिमा कटरे यांनी सांगितले.