दिवाळीच्या वेळीच बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:46 PM2017-10-17T23:46:53+5:302017-10-17T23:47:06+5:30
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने दोन्ही आगारातील बससेवा १०० टक्के ठप्प पडली होती.
सध्या दिवाळीचे दिवस सुरू झाले आहेत. अशात रेल्वे प्रमाणेच एसटी बसेससुद्धा भरभरून जातात. मात्र एक सणाच्या हंगामाच्या प्रसंगीत एसटीच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारल्याने बस सेवाच ठप्प पडली व प्रवाशांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागला.
महाराष्टÑ श्रमिक संघ मान्यता व अनुसूचित कामगार प्रतिबंध कायदा १९७१ मधील कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षांना संपाचे नोटीस देण्यात आले. यात १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व आगार व मध्यवर्ती कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांनी संप पुकारण्याची माहिती दिली. संप पुकारण्यापूर्वी कामगारांचे मतदान घेवून संप करण्यास बहुमत आहे किंवा नाही, हे तपासण्यात आले. यात सुमारे ८५ हजार ०५० कामगारांनी सहभाग घेतला होता. त्यात ९९ टक्के कामगारांनी सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा, या मागणीसाठी पाठिंबा दर्शविला. त्यानुसार सदर आयोग रा.प. कामगारांना लागू करावा या मागणीच्या अनुषंगाने सुधारित वेतनश्रेणी व करावयाची वेतन निश्चिती याबाबतचा प्रस्ताव महाराष्टÑ स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने २९ सप्टेंबरला पाठविला. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तिरोडा आगाराची बस सेवा सोमवार (दि.१७) सकाळपासून पूर्णत: ठप्प पडलेली होती. सर्व कामगार एकत्र आले होते. यात वाहकांमध्ये खाडे, भताने, कातकरे, कुर्वे, मडारे, गीते, बोकडे, इंगळे, बारस्कर, खुणे, देशमुख; चालकांमध्ये करडे, सोनवाने, चौरे, डहाके, गणवीर, सुनील, के. शेख, आर. झगेकार, निजाम, कडव, पी. पटले, कळपाते तर यांत्रिकांमध्ये कनोजे, गजभिये, मधूकर पारधी, बोरकर, इरफान, डोंगरे, बावणथडे, पटले आदी अनेक कामगारांचा समावेश आहे.
तर गोंदिया आगारातही कृती समिती संपावर असल्याने बस सेवा ठप्प पडली. यात कामगार संघटनेचे अध्यक्ष सईद शेख, सचिव आर. सोनवाने, इंटक संघटनेचे अध्यक्ष महेश तिघारे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष लियाज शेख, सचिव एस. मेश्राम, कामगार सेनेचे सचिव प्रकाश रामटेके व सदस्यांमध्ये नसीमभाई, पुरी, शाहीद, वहीद, गोसावी, एस. तिवारी, शरीफ खान, टी.सी. पाथोडे, चौरसिया, रामटेके, पाठक, सादीक, यादव, चंद्रिकापुरे, किशोर नेवारे, डोये, स्वाती टेंभुर्णे, पौर्णिमा टेंभुर्णे, आर. पटले, शुभांगी, बबली रूद्रकार, हटवार, वर्षा, केवल नेवसे, जावेद, हापीज पठान आदी अनेक कर्मचाºयांचा समावेश आहे.