रस्त्याचे सायडिंग भरण्याचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:07+5:302021-03-20T04:27:07+5:30
गोठणगाव : परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, परंतु डांबरीकरणानंतर रस्त्याकडेला रस्त्याला समांतर सायडिंग भरण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे ...
गोठणगाव : परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, परंतु डांबरीकरणानंतर रस्त्याकडेला रस्त्याला समांतर सायडिंग भरण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
गोठणगाव, नवेगावबांध रस्त्याचे डांबरीकरण अपूर्णच ठेवण्यात आले आहे. सन २०१८-१९मध्ये, गोठणगाव - सुकडी मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. गोठणगाव - नवेगावबांध या मार्गाचे डांबरीकरणही अर्धवट केले. त्याचप्रमाणे राज्य महामार्ग पवनी/धाबे, चिचगड या मार्गाचे डांबरीकरण केले. परंतु, एकाही मार्गाच्या सायडिंगचे काम केले नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अर्जुनी/मोरगावचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कामाची चौकशी करुन सायडिंगचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.