कोरोना टेस्टिंग व लसीकरण केंद्रावर होतेय नागरिकांची गैरसोय ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:58+5:302021-05-06T04:30:58+5:30

देवरी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोक कोरोना टेस्टिंग व लसीकरणाकरिता ...

Inconvenience to citizens at Corona Testing and Vaccination Center () | कोरोना टेस्टिंग व लसीकरण केंद्रावर होतेय नागरिकांची गैरसोय ()

कोरोना टेस्टिंग व लसीकरण केंद्रावर होतेय नागरिकांची गैरसोय ()

Next

देवरी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोक कोरोना टेस्टिंग व लसीकरणाकरिता कोरोना केंद्रावर जात आहेत. मात्र देवरीच्या कोरोना टेस्टिंग व लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना केंद्रावरील गैरसोयीअभावी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लसीकरण केंद्रावर शेडची व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात केंद्राबाहेर उभे राहावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या विषयाकडे देवरी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप गुप्ता यांचे लक्ष जाताच त्यांनी स्वत: या केंद्रावर भेट देऊन लोकांना होणाऱ्या या त्रासाबाबत माहिती घेतली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात खूपच वाढत आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोक कोरोना टेस्टिंग व लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने जात आहेत. देवरीच्या कोरोना टेस्टिंग व लसीकरण केंद्राबाहेर लोक तासनतास उभे राहत आहेत. भर उन्हाळ्यात त्यांच्यावर कसल्याहीप्रकारचे छत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाकडून या केंद्रावर कसल्याही प्रकारची सोय नाही. या गंभीर विषयाबाबत माहिती देवरी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप गुप्ता यांना मिळताच त्यांनी या केंद्रावर भेटून लोकांशी चर्चा केली. केंद्रावर येणाऱ्या लोकांकरिता बाहेर मंडप व पाण्याची सोय करून दिली. त्यामुळे थोडी गैरसोय दूर करण्यास मदत झाली.

Web Title: Inconvenience to citizens at Corona Testing and Vaccination Center ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.