अवैध दारु विक्रेत्यांवर आवळला फास

By Admin | Published: April 3, 2017 01:33 AM2017-04-03T01:33:57+5:302017-04-03T01:33:57+5:30

जिल्हा पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध फास आवळला असून १ एप्रिल रोजी धाड सत्र राबविले.

Incorporation of illegal liquor vendors | अवैध दारु विक्रेत्यांवर आवळला फास

अवैध दारु विक्रेत्यांवर आवळला फास

googlenewsNext

गोंदिया : जिल्हा पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध फास आवळला असून १ एप्रिल रोजी धाड सत्र राबविले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी व मोहफुलाची दारू जप्त केली आहे.
यात, ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत अदासी तांडा येथील संतोष देवीसिंह बैस (३८) कडून देशी दारुचे पव्वे ९६ , फुलचूरटोला येथील प्रमिला चचाणे (३५) कडून सहा लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलिसांनी गोंडमोहाडी येथील रमेश राऊत (६२) कडून सात लिटर मोहफुलाची दारु, महालगाव येथील यशवंत नागपुरे (६२) कडून १० लिटर हाभ. दारु, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सोनेगाव येथील विनय पारधी (३६) कडून देशी दारुचे नऊ पव्वे, बरबसपुरा येथील जाराम बुरे (४३) कडून पाच लिटर हाभ. दारु, बोरा येथील रत्नाकर डोंगरे कडून पाच लिटर हाभ.दारु, धामनेवाडा येथील खेमेश्वर मसराम (३५) कडून पाच लिटर हाभ.दारु पकडली.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या बोंडगावदेवी येथील रामनाथ मेश्राम (५३) कडून देशी दारुचे सहा पव्वे, झरपडा येथील मारोती पुल्लीवार (७३) कडून देशी दारुचे ३० पव्वे, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कुणबीटोला येथील सुरेश मेश्राम (३८) कडून १० लिटर मोहफुलाची दारु, रावणवाडी पोलिसांनी कामठा येथील किशोर गजभिये (४०) कडून १० लिटर हातभट्टीची दारु, तिरोड्याच्या संत सजन वॉर्डातील रंजीत चौरे (३८) कडून १० लिटर हाभ. दारु, वडेगाव येथील रामचंद्र बिंझाडे (६७) कडून पाच लिटर हाभ. दारु,देवरी तालुक्याच्या पिंडकेपार येथील मिलींद टेंभुरकर (४६) कडून देशी दारुचे ९० पव्वे, देवरी येथील भोजराज कांबळे (४०) कडून देशी दारुचे सहा पव्वे, ठानेगाव येथील राष्ट्रपाल गजभिये (५५) कडून पाच लिटर हाभ. दारु जप्त करण्यात आली. गोंदिया शहराच्या संजयनगर येथील विजय गडपायले (५२) कडून आठ लिटर हाभ. दारु, संविधान चौकातील बंडू मेश्राम (३५) कडून पाच लिटर हाभ.दारु, अर्जुनी-मोरगाव येथील शंकर मेश्राम कडून देशी दारुचे नऊ पव्वे, नवेगावबांध पोलिसांनी पंचमुर्ती वॉर्डातील योगेश देशमुख (३१) कडून देशी दारुचे ३० पव्वे, रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत कटंगीकला येथील देवीदास मेश्राम (६६) कडून देशी दारुचे २५ पव्वे, कुडवाटोली येथील मनोज निकोसे (४२) कडून पाच लिटर मोहफुलाची दारु,तिरोडा तालुक्याच्या केसलवाडा येथील विनोद बालचंद कनोजे (३२) याच्याकडून १० लिटर हाभ.दारु जप्त करण्यात आली.

Web Title: Incorporation of illegal liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.