विद्युत चोरीच्या प्रमाणात वाढ

By admin | Published: August 17, 2016 12:19 AM2016-08-17T00:19:44+5:302016-08-17T00:19:44+5:30

पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरातील पंचक्रोशीतील गावामध्ये दिवसाढवळ्या विद्युत तारांवर आकडे टाकुन विद्युत चोरी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले

Increase in the amount of electricity theft | विद्युत चोरीच्या प्रमाणात वाढ

विद्युत चोरीच्या प्रमाणात वाढ

Next

भुर्दंड सामान्यांना : विद्युत विभागाचे दुर्लक्ष
चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरातील पंचक्रोशीतील गावामध्ये दिवसाढवळ्या विद्युत तारांवर आकडे टाकुन विद्युत चोरी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यांचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. मात्र या सर्व बाबींकडे वाघाचे कातडे पांघरुन कुंभकर्णी झोपेत असलेले विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून केला जात आहे.
चिचाळ अड्याळ जि.प. क्षेत्राीतल गोसे, आकोट, पाथरी, सौंदड, नेरला, वासेळा, सुरबोडी, कुर्झा, इटगाव, पाथरी टोली, नवेगाव आदी गावात वॉटरपंप घरलाईन चे दिवसा ढवळ्या आकडे टाकून चोरी केली जात आहे. चिचाळ येथे तर गेल्या तीन वर्षापासून बाजार चौकातील एका म्हशी पालकांनी म्हशीचे रस्त्यावरील मलमुत्र वाहते करण्यासाठी सरकारी विहिरीवर वॉटरपंप बसवून विद्युत तारेवर आकडे टाकून विद्युत चोरी करत आाहे. सदर व्यक्ती संदर्भात विद्युत विभागाला अनेकदा सांगूनही अधिकारी मध्ये देवाण घेवाण होत असावी असा प्रश्न वीज ग्राहक करीत आहेत. विद्युत चोरीच्या प्रचंड वाढीमुळे मिटरधारकांच्या घरातील फ्रिज, कुलर, टिव्ही, पंखे आदी विद्युतवर चालणारे उपकरणे कमी जास्त दाबामुळे निकामी झाल्याची उदाहरणे आहेत.
विद्युत चोरी थांबविण्याकरिता भरारी पथकांची तात्काळ नियुक्ती करून चोरट्यावर कारवाई करावी अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. अन्यथा व्मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Increase in the amount of electricity theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.