कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:42+5:302021-04-18T04:27:42+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन ...

Increase the capacity of Kovid hospital beds | कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवा

कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवा

googlenewsNext

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

शनिवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोविड उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लस उपलब्धता, रेमडेसिविर, ऑक्सिजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. मंत्री वडेट्टीवार म्हणाले, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात भर देण्यात यावा आणि ज्या रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे, त्या ठिकाणी खासगी हॉस्पिटल व डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. खासगी हॉस्पिटलमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यात आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्ट वाढविण्याच्या सूचना केल्या.

सभेला निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते.

......

ऑक्सिजनसाठी राजनांदगावशी संपर्क साधा

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राजनांदगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात आला असून ती लवकरच उपलब्ध होणार आहेत. खासगी व शासकीय रुग्णालयांतील कोरोना रुग्णांची माहिती सांकेतिक स्थळावर (डॅशबोर्डवर) प्रसिद्ध करण्यात यावी. पोलीस यंत्रणेने संचारबंदीमध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा.

.......

३० टक्के निधी राखीव ठेवा

कोरोना उपाययोजनेवर जिल्हा नियोजन समितीमधून ३० टक्के निधी खर्च करण्यात यावा. कोरोना उपाययोजनेबाबत आपण निधीची मागणी करा, निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोराना रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले.

Web Title: Increase the capacity of Kovid hospital beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.