अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा बस सुरू करून फेऱ्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:41+5:302021-01-13T05:14:41+5:30
बाराभाटी : कोरोनामुळे बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आता हळूहळू सावरताना दिसत आहे. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांना ...
बाराभाटी : कोरोनामुळे बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आता हळूहळू सावरताना दिसत आहे. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांना प्रवास करायला फक्त बस सुविधा आहे. मात्र, या मार्गावर काही निवडकच बस धावतात. त्यामुळे प्रवास सुरळीत व वेळेच्या आत होत नाही. करिता अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
या मार्गावर अर्जुनी- मोरगाव ते गोंदिया तसेच ब्रह्मपुरी ते गोंदिया या २ बस धावतात व त्यामध्ये अत्याधिक गर्दी असते. त्यात बस वेळेवर कधीच येत नाही. त्यामुळे अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा या मार्गावरील प्रवाशांना अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा- गोंदिया असा प्रवास करायला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कोहमारा ते अर्जुनी- मोरगाव या मार्गावरील नागरिकांना बसमध्ये घेतच नाहीत, अशा वेळी या प्रवाशांनी काय करावे? असा सवाल केल जात आहे. रेल्वे बंद असल्याने अनेक नागरिक व विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण होत आहे.
-------------------------
बसच्या ४ फेऱ्या करा
या मार्गावर बसच्या दररोज ४-५ फेऱ्या असायला हव्या. प्रत्येक बसस्थानकावर बस थांबविली पाहिजे. ठरलेल्या वेळेवर यायला पाहिजे. ब्रह्मपुरी-गोंदिया बस प्रत्येक स्थानकावर थांबत नाही. या मार्गावर लहान-सहान प्रवासी निवारे आहेत. खेड्यापाड्यांचा भाग आहे. त्यात रेल्वे बंद आहे. म्हणून बसकडे अनेक नागरिकांची धाव आहे. मात्र, या मार्गावर बस नसल्याने बसच्या ४ फेऱ्या करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
------------------------------
मी आपल्या गावावरून नवेगाव बांध येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिकायला जातो. या मार्गावर धावणाऱ्या बस थांबवायला पाहिजेत; परंतु थांब॔वत नाहीत. म्हणून अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा बस पाहिजे.
- सुहास सुरेश बोरकर,
विद्यार्थी, येरंडी.