लॉकडाऊन काळात फळांच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:52+5:302021-06-16T04:38:52+5:30

एसटीतील राखीव जागांचा वापर नाही बिरसी-फाटा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. ...

Increase in fruit prices during lockdown | लॉकडाऊन काळात फळांच्या किमतीत वाढ

लॉकडाऊन काळात फळांच्या किमतीत वाढ

Next

एसटीतील राखीव जागांचा वापर नाही

बिरसी-फाटा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र, या बसेसमधील आरक्षित जागांचा कधीच वापर होत नसल्याचे दिसून येते. एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिले असते यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार अशाप्रकारे राखीव सीट असतात; परंतु यांचा वापर होत नाही.

भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त

गोरेगाव : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्सकिट नसल्यामुळे प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागते.

खड्डयांमुळे अपघातांची शक्यता

सालेकसा : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्डयांमध्ये भरण घालण्यात आली असली तरी ते धोकादायकच आहेत.

डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त

गोंदिया : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. डासांचे निर्मूलन करण्याची मागणी नागरिकांनी केली.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा

तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे.

कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी

तिरोडा: जिल्ह्यातील नाटक, तमाशा,गोंधळ, भारुड यासारख्या इतर कलेच्या कलावंतांना एक विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नाटक, तमाशा गोंधळ भारुड या कलेचे कलावंत श्रोत्यांचे मनोरंजनास प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत. कलेच्या सादरीकरणातून जी मिळकत मिळते त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

महामार्गावर वाहतुकीची कोंडी

देवरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.

शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ

अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदीकाठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे शेतात शिरुन धान पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधले असल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे.

Web Title: Increase in fruit prices during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.