लॉकडाऊन काळात फळांच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:23+5:302021-07-15T04:21:23+5:30
एसटीतील राखीव जागांचा वापर नाही बिरसी-फाटा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. ...
एसटीतील राखीव जागांचा वापर नाही
बिरसी-फाटा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र, या बसेसमधील आरक्षित जागांचा कधीच वापर होत नसल्याचे दिसून येते. एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिले असते यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार अशाप्रकारे राखीव सीट असतात; परंतु यांचा वापर होत नाही.
कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी
तिरोडा: जिल्ह्यातील नाटक, तमाशा,गोंधळ, भारुड यासारख्या इतर कलेच्या कलावंतांना एक विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नाटक, तमाशा गोंधळ भारुड या कलेचे कलावंत श्रोत्यांचे मनोरंजनास प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत. कलेच्या सादरीकरणातून जी मिळकत मिळते त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
महामार्गावर वाहतुकीची कोंडी
देवरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ
अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदीकाठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे शेतात शिरुन धान पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधले असल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे.
रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बारमागे तसेच अन्य ठिकाणी रेतीचा मोठा साठा पडलेला असतो. रेतीमाफिया ही रेती टाकून ठेवतात व असून याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त
गोरेगाव : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्सकिट नसल्यामुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.
खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
सालेकसा : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आली असली तरी ते धोकादायकच आहेत.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
गोंदिया : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असून शहरवासी त्रस्त झाले आहेत.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा
तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे.
वातावरण बदलांमुळे आजारांची भीती
गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट घोंगावत असतानाच, अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. कोरोनामुळे नागरिक अगोदरच घाबरलेले आहेत. त्यात सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास नागरिक कोरोनाची धास्ती घेत आहेत.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
गोंदिया : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही वाहनचालक साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे समोरील वाहनाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रखर दिवे लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गावागावातील हातपंप नादुरुस्त
गोंदिया : जिल्ह्यातील गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अशात हे हातपंप दुरुस्त करण्याची गरज असून तशी मागणी केली जात आहे.