मानधनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 08:42 PM2017-09-23T20:42:36+5:302017-09-23T20:42:53+5:30

११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) ....

Increase the honor | मानधनात वाढ करा

मानधनात वाढ करा

Next
ठळक मुद्देसेविका व मदतनीसांची मागणी : विस्तार अधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) यांच्या संयुक्तवतीने सोमवारी (दि.१८) येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी नंदा पारवे यांना देण्यात आले.
निवेदनात, ११ सप्टेंबरपासून मानधनात वाढ करण्यात यावी, आहार दर वाढविण्यात यावा, आजारपणाची १५ दिवसांची सुटी लागू करावी, दिवाळीचा बोनस एक महिन्याच्या पगारा एवढा द्यावा, रजिस्टर अहवाल पुरविण्यात यावा यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी पारवे यांच्या मार्फत महिला-बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी आयटकचे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सहसचिव सुनिता मलगाम, परेश दुरूगवार, चरणदास भावे, लता बोरकर, जयकुवर मच्छीरके, सुशिला फुंडे, सुमित्रा रंगारी, माया उके, सुनिता मडावी, मनिषा डिब्बे, लक्ष्मी मरसकोल्हे, सुशिला मेंढे, रत्नमाला बडगाये यांच्यासह मोठ्या संख्येत सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
तिरोडा : तिरोडा येथे रहांगडाले यांच्या नेतृत्वात निवेदन देताना शकुंतला फटींग, परेश दुरूगवार, ब्रिजुला तिडके, जिवनकला वैद्य, दुर्गा संतापे, नंदू कावडे, निमाक्षी पटले, वंदना पटले, प्रेमलता गेडाम, सिमवता दखने, शोभा पटले यांच्यासह मोठ्या संख्येत सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
- जीआरची होळी जाळली
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नागरिक प्रकल्पाची सभा विठा पवार यांच्या अध्यक्षतेत कामगार भवन येथे शुक्रवारी (दि.२२) घेण्यात आली. सभेत जिल्हा अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, परेश दुरुगवार, प्रणीता रंगारी यांनी मार्गदर्शन केले. ११ सप्टेंबर पासून सुरु असलेल्या संपाबाबत माहिती दिली. राज्य शासनाद्वारे सेविका मदतनिस यांच्या मानधनवाढीवर राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा तिव्र निषेध करण्यात आला. राज्य सरकार संप मोडण्यासाठी प्रयत्नात आहे. आरोग्य विभाग मार्फत काम करण्याचा कट आहे. परंतु महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक युनियनने आशा काम करणार नाही असा निर्णय घेण्यात आला. त्याचा सभेत स्वागत करण्यात आला. दरम्यमन आंगणवाडी सेविका मदतनीस विरोधी जीआरची होळी राज्यलक्ष्मी चौकात विठा पवार यांच्या हस्ते जाळण्यात आली.

Web Title: Increase the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.