अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:59+5:302021-02-12T04:26:59+5:30
गोंदिया : अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वाढवा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी ...
गोंदिया : अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वाढवा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) येथील जिल्हा परिषद महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, बंद व खराब झालेले जुने मोबाईल परत घेऊन मोबाईल दुरस्तीच्या नावावर पैसे घेण्यात येऊ नयेत, २०२०-२१करिता साडी-ड्रेसचे पैसे देण्यात यावे, सन २०२०-२१चा परिवर्तन निधी देण्यात यावा, प्रवास बिलांची थकीत रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी केली आहे.