अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:23+5:302021-09-05T04:33:23+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ४६६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३६८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट ...

Increase in the number of corona patients in Arjuni Morgaon taluka | अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

Next

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ४६६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३६८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३ नमुने कोरोना बाधित आढळले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६ टक्के होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४८०२९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२८५४८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९४८१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२०८ नमुने कोरोना बाधित आढळले. तर आतापर्यंत ४०४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने थोडी चिंता वाढली आहे.

...........

सणासुदीच्या दिवसात घ्या काळजी

कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु होती. पण मागील दोन तीन दिवसांपासून रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. तर पुढे गणेशोत्सव इतर सण आहे. हे सण उत्सव सुरळीत पार पडावे यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन स्वत:ची आणि कुटुंबाची योग्य काळजी घेतल्यास हे सर्व सुरळीतपणे पार पाडणे शक्य आहे. त्यामुळे हे सर्व नागरिकांवरच अवलंबून आहे.

............

लसीकरणाचा आठ लाखांचा टप्पा पूर्ण

कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. यापैकी आतापर्यंत ८१४२३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ६२२४८२ नागरिकांना पहिला तर १९१७५० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

..........

Web Title: Increase in the number of corona patients in Arjuni Morgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.