साखरीटोला येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:29 AM2021-04-08T04:29:50+5:302021-04-08T04:29:50+5:30

६ एप्रिल ८ तर ७ तारखेला ५ रुग्ण कोरोना बाधित झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे दररोज रुग्णांमध्ये होणारी ...

Increase in the number of corona patients at Sakharitola | साखरीटोला येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

साखरीटोला येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Next

६ एप्रिल ८ तर ७ तारखेला ५ रुग्ण कोरोना बाधित झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ बघून प्रशासनाने दक्षता घेतली आहे. उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाठ, तहसीलदार शरद कांबळे, नायब तहसीलदार भुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खोडणकर यांनी तातडीने साखरीटोला येथे येऊन पाहणी केली व वाॅर्ड क्रमांक चार व तीनला कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. डॉ. अनिल खोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सातगाव येथील १३८ नागरिकांची कोरोना चाचणी केल्याची माहिती दिली. कन्टेन्मेंट झोनमधील एकूण ७० कुटुंबांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यासाठी सहा सहा कर्मचाऱ्यांचा तीन चमू तयार करण्यात आला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर व अँटिजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करावे असे मंडळ अधिकारी डी. हत्तीमारे, तलाठी बाकडे, तलाठी पटले, ग्रामसेवक रहांगडाले यांनी कळविले आहे.

Web Title: Increase in the number of corona patients at Sakharitola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.