रेल्वे प्रवासी सुविधा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2017 01:44 AM2017-05-05T01:44:27+5:302017-05-05T01:44:27+5:30
शनिवारी ६ मे रोजी मंडळ रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची बैठक आहे. त्यासाठी प्रवाशांच्या सुविधांना घेवून समितीचे सदस्य गोकूल कटरे यांनी सल्ला दिला आहे.
सल्ला : सल्लागार समितीची बैठक
गोंदिया : शनिवारी ६ मे रोजी मंडळ रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची बैठक आहे. त्यासाठी प्रवाशांच्या सुविधांना घेवून समितीचे सदस्य गोकूल कटरे यांनी सल्ला दिला आहे.
बालाघाट-जबलपूर मार्ग लवकरच मोठ्या लाईनमध्ये बदलणार आहे. त्यामुळे गोंदिया स्थानक येणाऱ्या दिवसांत महत्वपूर्ण जंक्शन स्थानक होईल. स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी सर्कुलेटिंग एरियाचे विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी स्थानकाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांना विकसीत करण्याची गरज आहे.
दक्षिणेकडे एमएफसी असलेल्या क्षेत्राला सर्कुलेटिंग क्षेत्राच्या विस्तारीकरणात समावेश करण्यात यावा. तसेच स्थानकाच्या दोन्ही बाजूकडे रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करून काहींनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे निकास द्वारावर कुजेशनची समस्या राहते. ती समस्या सोडविण्याची व्यवस्था करण्यात यावी.
स्थानकाच्या मधातल्या फुट ओव्हर ब्रिजच्या विस्तारीकरणाची मागणी प्रलंबित आहे. या ब्रिजला त्वरित प्लॅटफॉर्म-२, ५ व ६ ला जोडण्यात यावे. फुट ओव्हर ब्रिजवर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लहान लहान संकेत बोर्ड लावण्यात यावे. हे बोर्ड अनेकदा गायब होत असल्याने प्रवाशांना समस्या होते. त्यामुळे त्यांना बदलवून आधुनिक ग्लो साईन बोर्ड लावण्यात यावे, त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळू शकेल.
गोंदिया स्थानकावर प्रवासी सुविधांमध्ये कमी करण्यात आली आहे. काही दिवसांपर्यंत प्रवासी सुविधांसाठी पोएट (पॅसेंजर आॅपरेटेड इंक्वॉयरी टर्मिनल) ची व्यवस्था होती. परंतु ही सोय आता नसल्याने गरीब प्रवासी त्रस्त दिसून येत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देवून ही सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे.
प्लॅटफॉर्म-५ व ६ वर कॅटरिंगची सोय करण्यात यावी. नागपूरच्या दिशेने असलेल्या गोंदियाच्या रेल्वे अंडरग्राऊंड ब्रिजला व्हाईट वॉश मर्क्युरी करणे आवश्यक आहे. तसेच तेथे पर्याप्त प्रकाश व्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे अपघात व असामाजिक तत्त्वांवर आळा बसू शकेल. (प्रतिनिधी)