रजेगाव-काटी उपसा सिंचन लाभक्षेत्रात होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 08:49 PM2017-09-23T20:49:22+5:302017-09-23T20:49:34+5:30
रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत रजेगाव व काटी मायनरवर येत असलेल्या गावांना रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत आमदार अग्रवाल यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेसह नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेसाठी राज्यपालांची विशेष मंजूरी मिळाली असल्याचे सांगत योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात सिंचन विभाग ढिलाई करीत असल्याचे सांगीतले. तसेच तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेच्या अंतीम टप्प्यात सुरू असलेल्या कामालाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी सचिवांकडे केली. शिवाय डांगोरली येथे प्रस्तावीत बॅरेजसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी बैठकीत दिली.
तसेच आता या बॅरेजला लवकरात लवकर मंजूरी मिळावी यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी सचिवांना विनंती केली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी मांडलेल्या विषयांवरील चर्चेनंतर सचिवांनी प्रस्तावीत रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राच्या विस्ताराला मंजुरी देत विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांना निर्देश दिले. शिवाय अन्य विषयांवरही त्वरीत कारवाई करण्याबाबत संबंधीतांना निर्देश देण्यात आले.
यामुळे तालुक्यातील महत्वपूर्ण योजनांना गती मिळून येणाºया वर्षात योजनांच्या लाभक्षेत्रात सुमारे २० हजार एकर पर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज आ. अग्रवाल यांनी व्यक्त केला.