रस्त्यावरील चुरीने अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:23 AM2018-04-08T00:23:00+5:302018-04-08T00:23:00+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते सालईटोला गावापर्यंत डांबरीकरण मार्गाचे काम दोन महिन्यापुर्वी सरू करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण न करता नुसते खडीकरण करुन त्यावर चुरी टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले.

Increase in road accidents in the chary with chary | रस्त्यावरील चुरीने अपघातात वाढ

रस्त्यावरील चुरीने अपघातात वाढ

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रस्ता डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते सालईटोला गावापर्यंत डांबरीकरण मार्गाचे काम दोन महिन्यापुर्वी सरू करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण न करता नुसते खडीकरण करुन त्यावर चुरी टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले. परिणामी चुरीवरुन वाहन घसरून अपघात घडत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ ते सालईटोला गावाचे अंतर १३ किमी आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले व त्यावर चुरी टाकण्यात आली परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही डांबरीकरणाला सुरुवातच झाली नाही. परिणामी वाहन घसरुन अपघात घडत आहेत. शिवाय वाहन पंक्चर होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. सालईटोला ते शेंडा, कोयलारी, पुतळीपासून महामार्ग क्रं. ६ या रस्त्याची अवस्था चांगली असताना त्याच रस्त्याला डांबरीकरण करण्याची लगीन घाई सार्वजनिक बांधकाम विभागाला का? गावकऱ्यांच्या समजण्या पलिकडे आहे. याच मार्गाला जोडणाºया शेंडा ते सडक -अर्जुनी मार्गाची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नव्हे तर चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले गेले. यावरुन विविध चर्चेला ऊत आला आहे.
शेंडा ते उशीखेडा या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट आहे. वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून या मार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील गावकºयांनी अनेकदा केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. यावरुन सां. बा. विभागाच्या काम करण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
हा परिसर आदिवासी बहुल नक्षल क्षेत्रात मोडतो. त्यामुळे या परिसरातील विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष केले जाते अशी ओरड आहे. याचे उदाहरण म्हणजे दोन महिन्यांपासून रस्त्यावर चुरी टाकून डांबरीकरणाला सुरुवातच झाली नाही. त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र दुर्दशा झालेल्या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने चुरी हटवून डांबरीकरण करण्यात यावे तसेच शेंडा ते सडक-अर्जुनी मार्गाचे नव्याने डांबरीकरण करावे अशी मागणी गावकºयांची आहे.

Web Title: Increase in road accidents in the chary with chary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.