सक्रिय राजकारणात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:43+5:302021-08-21T04:33:43+5:30
गोंदिया : युवाशक्ती सोबतच महिला शक्तीची साथ मिळाल्यास पक्ष बळकट होणार. यामुळे सक्रिय राजकारणात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवा, ...
गोंदिया : युवाशक्ती सोबतच महिला शक्तीची साथ मिळाल्यास पक्ष बळकट होणार. यामुळे सक्रिय राजकारणात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कॉँग्रेस भवन येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. येत्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग व नगर परिषदेतील सदस्य आरक्षण लक्षात घेता महिलांनी सक्रिय राजकारणात महत्त्वाची भूमिका, वाॅर्डनिहाय महिलांची बुथ कमिटी तयार करणे तसेच प्रत्येक वाॅर्डात महिलांचा सहभाग वाढवून संघटन मजबूत करणे यासंबंधी चर्चा करण्यात आली. बैठकीला राजू एन. जैन, राजलक्ष्मी तुरकर, आशा पाटील, सविता मुदलीयार, मालती कापसे, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, लता रहांगडाले, ललिता ताराम, एम.ए. बैस, पुस्तकला माने, रुपकुमारी श्रीवास्तव, निकिता कोकाटे, आशा कुंभारे, मंदा दळवी, लक्ष्मी वाढईकर, सनम वासनिक, शकुन पाचे, दीप्ती गुनानी, धुरपता बांडेबुचे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.