भाजप सरकारच्या काळात रोजगाराऐवजी बेरोजगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:04 PM2019-04-04T21:04:51+5:302019-04-04T21:05:37+5:30
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे. भाजप सरकारच्या काळात रोजगार मिळण्याऐवजी उलट बेराजगारीत वाढ झाली असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी (दि.४) फुलचूर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.आरोग्य सभापती विमल नागपूरे, सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, माजी सभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रयणी धावडे, योगराज उपराडे, अनित मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले केंद्रात आघाडी सरकार सत्तेवर आल्यास २२ लाख पदे त्वरीत भरण्यात येतील. मोदी सरकारने प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख येण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता केली नाही. तर लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. भाजप सरकारच्या जीएसटी, नोटबंदी सारख्या निर्णयामुळे लघु उद्योजक संकटात आले आहे.
त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ आहे. या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.