लालपरीला वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:11+5:30

अवघ्या देशात कोरोनाचा भडका उडत आहे. त्यात राज्य आघाडीवर असून जिल्ह्यातही आता शेकडोंच्या घरात दररोज रूग्ण निघत आहेत.एकंदर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत चालली असून कोरोना झपाट्याने पाय पसरत आहे. अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क हे दोनच उपाय उरले आहेत. मात्र २२ प्रवाशांची अट हटविण्यात आल्याने ४४ प्रवासी आता लालपरीतून प्रवास करू लागले आहेत.

Increasing response to redness | लालपरीला वाढता प्रतिसाद

लालपरीला वाढता प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे२२ प्रवाशांची अट हटविली : आगाराच्या उत्पन्नात होत आहे वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला एसटी सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र एका गाडीत फक्त २२ प्रवासी बसविण्याची अट ठेवली होती. मात्र आता ती अटही हटविण्यात आली असल्याने लालपरी पुर्वीप्रमाणे प्रवाशांना घेऊन धावत आहे. आता प्रवासी प्रतिसादही मिळत असल्याने आगाराच्या उत्पन्नातही वाढ होत असल्याची माहिती आहे.
लॉकडाऊनमध्ये सुमारे ३ महिने राज्य शासनाने लालपरीची चाके थांबविली होती. परिणामी राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे. अशात मे महिन्यात राज्य शासनाने महामंडळाला एसटी चालविण्यास परवानगी दिली होती. मात्र लालपरीत फक्त २२ प्रवासीच बसविण्याची अट सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आली होती. यामुळे क्षमतेपेक्षा अर्ध्या प्रवाशांना घेऊन लालपरी धावत होती. त्यातही कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक एसटीतून प्रवास टाळत होते व आजची तीच स्थिती आहे.
मात्र तरिही थोडाफार प्रतिसाद मिळत होता व आतापर्यंत जेमतेम डिझेलचा खर्च निघणार अशा स्थितीत आगारातून फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता राज्य शासनाने लालापरीला लावून दिलेली २२ प्रवाशांची अट रद्द केल्याने शुक्रवारपासून (दि.१८) लालापरी पुन्हा गजबजून धावू लागली आहे.
विशेष म्हणजे, आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावावी लागणार असे आरोग्य विभागही म्हणत असल्याने नागरिक घराबाहेर पडत असून अन्यत्र प्रवासाला सुरूवात झाली आहे. परिणामी लालपरीला हळूहळू प्रतिसाद वाढत असल्याचे दिसत आहे. यातूनच आगाराच्या उत्पन्नातही वाढ होत असल्याचे आगार प्रमुख संजना पटले यांनी सांगीतले.

नीट परीक्षेत चांगला प्रतिसाद
मध्यंतरी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत जिल्ह्यातील मोठ्या संख्येत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी लालपरीतून प्रवास केला. परिणामी लालापरीत विद्यार्थी व पालकांचीच संख्या जास्त दिसून येत होती. तेव्हापासूनच लालपरीला प्रवासी प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली. आता विद्यार्थी व पालक नसले तरी २२ प्रवाशांची अट रद्द करण्यात आल्याने लालपरी पुन्हा पुर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे.
मात्र धोकाही वाढला
अवघ्या देशात कोरोनाचा भडका उडत आहे. त्यात राज्य आघाडीवर असून जिल्ह्यातही आता शेकडोंच्या घरात दररोज रूग्ण निघत आहेत.एकंदर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत चालली असून कोरोना झपाट्याने पाय पसरत आहे. अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क हे दोनच उपाय उरले आहेत. मात्र २२ प्रवाशांची अट हटविण्यात आल्याने ४४ प्रवासी आता लालपरीतून प्रवास करू लागले आहेत. अशात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.कोरोना संसर्ग पसरण्यास वाव असून यामुळे मात्र धोका वाढला आहे.

Web Title: Increasing response to redness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.